शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

एसआरपीच्या जवानांना मिळणार ३० साप्ताहिक सुट्ट्यांचे वेतन! मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 21:54 IST

राज्य राखीव पोलीस दलात (एसआरपी) कार्यरत असलेल्या २० हजारावर जवांनासाठी एक खुशखबर आहे.

- जमीर काझीमुंबई  - राज्य राखीव पोलीस दलात (एसआरपी) कार्यरत असलेल्या २० हजारावर जवांनासाठी एक खुशखबर आहे. नक्षलग्रस्त भागात बंदोबस्तासाठी ५-५ महिने ‘ऑन ड्युटी’ तैनात असल्याने त्यांच्या बुडणाऱ्या सर्व साप्ताहिक सुट्ट्यांच्या बदल्यात त्यांना त्याचे वेतन मिळणार आहे. सध्या मिळणा-या आठ सुट्ट्यांच्या वेतनाऐवजी त्यांना विशेष बाब म्हणून त्याची मर्यादा ३० दिवसापर्यत वाढविण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे.एसआरपीकडून सादर करण्यात आलेला प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडून मान्यतेसाठी मंत्रालयात पाठविला आहे. पोलिसांनी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी काम केल्यास त्यांना एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय राज्यात गेल्या तीन वर्षापासून लागू आहे. मात्र त्यासाठी एका कॅलेडर वर्षात जास्तजास्त ८ दिवसाची मर्यादा आहे. एसआरपी जवानांना मात्र बंदोबस्तामुळे त्यांना दरवर्षी ३०-३५ साप्ताहिक सुट्ट्यांना मुकावे लागते.त्यामुळे हा प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्याला मंजुरी मिळाल्यास जवानांना मोठा दिलासा मिळणार आहे.महाराष्ट्र पोलीस दलाच्या अखत्यारित एसआरपी हा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. महापूर, दुष्काळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीवेळी स्थानिकांना मदतीसाठी त्यांना पाठविले जाते. त्याचबरोबरच नक्षलग्रस्त भाग,घातपाती घटना, निवडणूका व अन्य महत्वाच्या कामावेळी राज्यभरातील विविध जिल्ह्यात आवश्यकतेनुसार बंदोबस्तासाठी पाचारण केले जाते. प्रसंगी काहीवेळा शेजारी राज्यातही बंदोबस्तासाठी पाठविले जाते. त्यासाठी१६ बटालियनातर्गंत(तुकडी) एकुण २० हजारावर जवानांची कुमूक राज्यभरात विविध ठिकाणी कार्यरत आहेत. दर दोन वर्षांनी प्रत्येक बटालियनला नक्षलग्रस्त भागात पाच महिन्यासाठी पाठविले जाते. तर अन्य ठिकाणच्या बंदोबस्तासाठी किमान दोन महिने तैनात रहावे लागते. या कालावधीत त्यांच्या साप्ताहिक सुट्टीवर पाणी सोडावे लागते. मात्र सरकारच्या नियमानुसार केवळ ८ दिवसांच्या सुट्टीचा पगार मिळत असल्याने त्यांच्या अन्य सुट्ट्याचे वेतन किंवा बदली सुट्टी दिली जात नव्हती. त्याबाबत जवानांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. पोलिसांच्या राज्यस्तरीय वृंद परिषदेतही हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याबाबत पोलीस महासंचालक सुबोध जैयस्वाल यांनी एसआरपीच्या प्रमुख अप्पर महासंचालक अर्चना त्यागी यांना त्यासंबंधी प्रस्ताव बनविण्याची सूचना केली होती. त्यानुसार त्यांनी एसआरपी जवानांना वर्षाला ३० साप्ताहिक सुट्ट्यांचा मोबदला दिला जावा, असा प्रस्ताव ३ मे रोजी महासंचालक कार्यालयाकडे पाठविला होता. हा प्रस्ताव आता अंतिम मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. साप्ताहिक सुट्टीच्या वेतनासाठी अटराज्य सरकारने तीन वर्षापूर्वी पोलिसांना साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी काम केल्यास त्या एक दिवसाचे वेतन देण्याचा आदेश लागू केला आहे. परंतू त्यातर्गंत एका वर्षात जास्तीजास्त ८ साप्ताहिक सुट्टयांचे वेतन देण्याची मर्यादा आहे. एसआरपीच्या जवांनाना मात्र ड्युटीमुळे वर्षाला किमान २० ते ३० साप्ताहिक सुट्टीवर पाणी सोडावे लागते. एसआरपीच्या मुंबई, नवी मुंबई,पुणे,नागपूरसह राज्यभरात एकुण १३ बटालियन आहेत. तर ३ आयआरबीच्या कंपन्या आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये साधारण बाराशे तर तेराशे जवानांचा समावेश असतो.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र