श्रीनिवास एमएमआरडीएमध्ये, म्हैसकर गृहनिर्माणमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 10:43 AM2021-06-04T10:43:31+5:302021-06-04T10:43:46+5:30

८ अधिकाऱ्यांची बदली

In Srinivas MMRDM, in Mhaskar Housing | श्रीनिवास एमएमआरडीएमध्ये, म्हैसकर गृहनिर्माणमध्ये

श्रीनिवास एमएमआरडीएमध्ये, म्हैसकर गृहनिर्माणमध्ये

Next

मुंबई : राज्य शासनाने गुरुवारी सहा आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. आर. ए. राजीव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रिक्त झालेल्या एमएमआरडीच्या आयुक्तपदी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची नियुक्ती केली. ते गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव होते. वन विभागाचे प्रधान सचिव असलेले मिलिंद म्हैसकर हे गृहनिर्माण विभागाचे नवे प्रधान सचिव असतील.

सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव लोकेश चंद्रा यांची बदली बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी करण्यात आली आहे. विकासचंद्र रस्तोगी हे सामान्य प्रशासन विभागात प्रधान सचिव म्हणून जात आहेत. सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक बी. वेणुगोपाल रेड्डी हे वन विभागाचे नवे प्रधान सचिव असतील. विकासचंद्र रस्तोगी हे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक होते. 

डॉ. श्रीकर परदेशी हे सिकॉमचे नवे व्यवस्थापकीय संचालक असतील. पंतप्रधान कार्यालयात संचालक असलेले परदेशी एक वर्षे परदेशात प्रशिक्षण घेत होते. गोंदियाचे जिल्हाधिकारी दीपककुमार मिना यांची बदली मंत्रालयात करण्यात आली.

अधिकाऱ्याचे नाव         सध्याचे ठिकाण    बदलीचे ठिकाण
एसव्हीआर श्रीनिवास    प्रधान सचिव, गृहनिर्माण                आयुक्त, एमएमआरडीए
मिलिंद म्हैसकर            प्रधान सचिव, वने                        प्रधान सचिव, गृहनिर्माण
लोकेश चंद्र                 प्रधान सचिव सामान्य प्रशासन         महाव्यवस्थापक, बेस्ट
बी.वेणुगोपाल रेड्डी         व्यवस्थापकीय संचालक, सिकॉम    प्रधान सचिव, वने        
विकासचंद्र रस्तोगी        प्रकल्प संचालक, 
    नानाजी देशमुख प्रकल्प      प्रधान सचिव, सामान्य प्रशासन 
सुमंत भांगे                   व्यवस्थापकीय संचालक, मत्स्य विकास     सचिव, सामान्य प्रशासन
डॉ. श्रीकर परदेशी         विदेशात शिक्षणाहून परत                 व्यवस्थापकीय संचालक, सिकॉम
दीपककुमार मिना      जिल्हाधिकारी, गोंदिया                    उपसचिव, बहुजन कल्याण मंत्रालय

Web Title: In Srinivas MMRDM, in Mhaskar Housing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.