एसआरए इमारतींसाठी यापुढे निविदा

By Admin | Updated: March 31, 2015 04:29 IST2015-03-31T04:08:01+5:302015-03-31T04:29:27+5:30

झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत इमारती उभारण्यासाठी यापुढे निविदा काढण्याचा शासनाचा विचार असल्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले.

SRA no longer tender for buildings | एसआरए इमारतींसाठी यापुढे निविदा

एसआरए इमारतींसाठी यापुढे निविदा

मुंबई : झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत इमारती उभारण्यासाठी यापुढे निविदा काढण्याचा शासनाचा विचार असल्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले.
गृहनिर्माण विभागाच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मेहता म्हणाले, आतापर्यंत ७० टक्के रहिवाशांची संमती मिळविणाऱ्या विकासकाला सध्याच्या पद्धतीनुसार एसआरएअंतर्गत इमारत उभारण्याचे काम दिले जाते. मात्र, आता निविदा काढून हे काम दिले जाईल. त्यामुळे स्पर्धा होईल आणि कामाचा दर्जाही चांगला असेल.
मेहता यांनी असेही जाहीर केले की, म्हाडाच्या मालकीच्या जमिनींवर झालेल्या झोपडपट्टयांचा विकास सरकारने स्वत: करावा, असा निर्णय तीन वर्षांपूर्वी झाला होता; पण एकाही ठिकाणी काम झाले नाही. आता हे काम झोपडपट्टी विकास प्राधिकरणामार्फत (एसआरए) करण्यात येईल. म्हाडाच्या इमारती उभारल्या आणि एनओसी दिले की विकासक मोकळे होतात. यापुढे लाभार्थी राहायला जात नाही तोवर विकासकांची जबाबदारी राहील, असे मेहता म्हणाले. मुंबईतील झोपडपट्टयांमध्ये आमदार फंडातून होणाऱ्या कामांमध्ये प्रचंड घोटाळे होत असल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली होती. त्यावर मेहता म्हणाले की, असे घोटाळे करणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले जाईल. हे गंभीर प्रकरण आहे. अशा घोटाळ्यांची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी आपण विरोधी पक्षात असताना तत्कालिन मुख्यमंत्र्यांकडे केली होती. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: SRA no longer tender for buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.