शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

नामदेव अध्यासनातून संतवाङ्मयाचा प्रसार

By admin | Updated: July 31, 2016 00:54 IST

संत नामदेवांनी भारतभर प्रवास करून समाजप्रबोधन, जनजागृतीची व्यापक चळवळ उभी केली.

पुणे : संत नामदेवांनी भारतभर प्रवास करून समाजप्रबोधन, जनजागृतीची व्यापक चळवळ उभी केली. त्यांनी भक्तिगीते आणि अभंगांची रचना करून समता आणि प्रभु-भक्तीची शिकवण दिली. संतवाङ्मयाचा अभ्यास, प्रचार आणि प्रसार तसेच, राष्ट्रीय एकात्मता साधणे यादृष्टीने १९८४ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत नामदेव अध्यासन सुरू करण्यात आले. संत नामदेवांवरील साहित्याची सूची, नामदेवांच्या गाथेचे नव्याने संपादन असे प्रकल्प अध्यासनाच्या माध्यमातून राबवले गेले असून, ते पूर्णत्वाकडे नेण्याचे प्रयत्न होत आहेत. गाथेच्या संपादनासाठी संत साहित्याच्या अभ्यासकांची संपादन समिती स्थापन करण्यात आली. हा प्रकल्प पाच वर्षांमध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने अध्यासनावर अभ्यासू व्यक्तीची निवड करून प्रकल्पांना गती मिळावी, यादृष्टीने विद्यापीठाकडून एक समिती नेमली असून समितीने अहवाल विद्यापीठाकडे सुपूर्त केला आहे.पुणे विद्यापीठात संत नामदेव अध्यासन स्थापन झाल्यानंतर १९८५ ते २००० अशी १५ वर्षे डॉ. अशोक कामत यांनी या अध्यासनाचे नेतृत्व केले. या अध्यासनाने लोकाश्रय मिळवून सुमारे दीडशे शोधप्रकल्प विद्यार्थ्यांच्या सहाय्याने पुरे केले. नामवंत अभ्यासकांकडून त्यांनी संदर्भग्रंथ मिळवणे, अध्यासनाचे ग्रंथालय, भारतीय संतसाहित्य, संस्कृती व इतिहासाला पूरक ठरतील, असे शोधप्रकल्प अध्यासनाने हाती घेतले व पूर्ण केले. अध्यासनातर्फे भारतीय संस्कृती संतसाहित्य व तत्त्वज्ञान यावरील सर्वाेत्कृष्ट ग्रंथलेखनासाठी दर वर्षी ग्रंथकार आणि प्रकाशक यांना परमहंस श्री स्वामी स्वरूपानंद पुरस्कार सन्मानपूर्वक दिला जातो. संतसाहित्यावरील संशोधनकार्याचा गौरव म्हणून संत नामदेव जीवनगौरव पुरस्कार व संत नामदेव शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. डॉ. कामत यांच्या निवृत्तीनंतर हिंदीच्या अभ्यासक डॉ. वीणा मनचंदा यांनी अध्यासनाच्या प्रमुखपदाचा कार्यभार सांभाळला. त्यांनीही अध्यासन अधिक समाजोन्मुख करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ही धुरा अविनाश आवलगावकर यांच्याकडे आली. त्यांनी पावणेदोन वर्षांच्या कालावधीत ‘नवीन परिप्रेक्ष्यातून नामदेव गाथेचा अभ्यास,’ ‘१९ व्या शतकातील धर्मचिंतन’ आणि ‘आधुनिक भारतातील धर्मचिंतन’ या महत्त्वाच्या विषयांवर तीन राष्ट्रीय चर्चासत्रे घेतली. >एका वर्षात उभारले दोन मजली महाविद्यालयघुमान येथील साहित्य संमेलनानंतर आकारास आलेल्या ‘बाबा नामदेव महाविद्यालया’चे उद्घाटन दि. १७ जुलै रोजी करण्यात आले. पंजाबमधील घुमानमध्ये मागील वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. यात भारतीय भाषा भवन आणि महाविद्यालयाची घोषणा केली होती. त्यानुसार महाविद्यालयाचे भूमिपूजन संमेलनादरम्यान झाले होते. एका वर्षात दोनमजली महाविद्यालय उभे राहिले असून, त्याला ‘बाबा नामदेव महाविद्यालय’ असे नाव दिले आहे. अमृतसरमधील गुरुनानक विद्यापीठात संत नामदेव अध्यासन सुरू करण्याच्या कामाला वेग आला असून त्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशीही बोलणी सुुरू आहेत.