पाणीपुरी टोळीने लावला साखर व्यापार्‍याचा स्पॉट

By Admin | Updated: May 22, 2014 02:14 IST2014-05-22T02:14:01+5:302014-05-22T02:14:01+5:30

गुपचूप (पाणीपुरी) विकणार्‍या टोळीने लकडगंजमधील साखर व्यापार्‍याचा स्पॉट लावला होता.

The spot of the sugar trader introduced by the Jalpuri band | पाणीपुरी टोळीने लावला साखर व्यापार्‍याचा स्पॉट

पाणीपुरी टोळीने लावला साखर व्यापार्‍याचा स्पॉट

नागपूर : गुपचूप (पाणीपुरी) विकणार्‍या टोळीने लकडगंजमधील साखर व्यापार्‍याचा स्पॉट लावला होता. या टोळीला रोकड लुटण्यात तर यश आले. मात्र, घोडा (पिस्तूल) अडल्याने (जाम झाल्याने) व्यापार्‍याचा जीव बचावला. शिवाय जमावाच्या हाती एक आरोपी लागला. त्याच्या जबानीतून या लुटमारीच्या घटनेचा उलगडा झाला.

छापरू नगरातील हरीश रोचीराम फुलवानी (वय ५७) यांची इतवारीतील मस्कासाथमध्ये रोचीराम लीलाराम फर्म आहे. ते साखर, तेल, मैद्याचा व्यापार करतात. मंगळवारी रात्री ११ वाजता दुकान बंद करून ते कपिल नामक मुलासह अँक्टीव्हाने घरी परत येत होते. बोंदरे हॉस्पिटलसमोर दोन मोटरसायकलस्वारांनी फुलवानीच्या दुचाकीला कट मारून खाली पाडले. लुटारूंनी डोळ्यात मिरची पावडर फेकल्यामुळे हरीश आणि कपिल हतबल झाले. ती संधी साधून फुलवानींच्या दुचाकीला अडकवलेली १२ लाख रुपये असलेली पिशवी हिसकावून घेतली. ती ताब्यात घेण्यासाठी फुलवानी धावले. ते प्रतिकार करीत असल्याचे पाहून लुटारूपैकी एकाने हवेत गोळीबार केला. फुलवानींचा आरडाओरड ऐकून मोठय़ा संख्येत परिसरातील लोक धावून आले. त्यांना आगे मत बढनाम्हणत आरोपींनी दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही गोळी पिस्तुलातच फसल्याने पुढचा अनर्थ टळला. घाईगडबडीत एका मोटरसायकलवरचे लुटारू रोकड घेऊन पळून गेले. परंतु दुसरी मोटरसायकल घसरून खाली पडल्यामुळे आरोपी राजेश राजन तोमर (रा. छावणी रेल्वे फाटक , बाडा, जि. ग्वाल्हेर) हा बाजूच्या झोपड्यात जाऊन लपला. संतप्त जमावाने तोमरला बाहेर खेचून बेदम चोप दिला. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच लकडगंज पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी तोमरला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: The spot of the sugar trader introduced by the Jalpuri band

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.