शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

राज्यात पावसाचा मुक्काम कधीपर्यंत? हवाानतज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 11:02 IST

Unseasonal Rain In Maharashtra: मुंबईसह राज्यभरातील अवकाळी पावसाचे ढग आता विरले असले तरी किंचित प्रभाव म्हणून १ डिसेंबरपर्यंत राज्यभरात ठिकठिकाणी तुरळक पावसाची हजेरी लागू शकते, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

मुंबई - मुंबईसह राज्यभरातील अवकाळी पावसाचे ढग आता विरले असले तरी किंचित प्रभाव म्हणून १ डिसेंबरपर्यंत राज्यभरात ठिकठिकाणी तुरळक पावसाची हजेरी लागू शकते, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.विदर्भातील ११ व खान्देशातील नंदुरबार, धुळे, जळगाव या तीन जिल्ह्यांसह एकूण १४ जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दोन दिवस आहे. मुंबईसह कोकण, मराठवाड्यासह उर्वरित राज्यांतील २२ जिल्ह्यांत १ डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणासह अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात  गारपिटीची शक्यता कुठेच नाही, असे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

मराठवाड्यात ६० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसानमराठवाड्यात गेल्या तीन दिवसांत ६१ मिमी. पावसाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात  पाच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.  या पावसाने मराठवाड्यातील ६० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. नांदेड जिल्ह्यातही २४ तासांत सरासरी २०.९० मिमी. पावसाची नोंद झाली असून ३ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला. मात्र, वाऱ्याचा वेग जास्त असल्याने तोडणीला आलेला ऊस तसेच ज्वारी पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.  हरभरा, तुरीवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. द्राक्षाच्या फळबागेसह, भाजीपाल्याचेही नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. परभणी जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे ५३ हजार ९७९ हेक्टरवरीलर पिकांचे नुकसान झाले. हिंगोली जिल्ह्यात मात्र, बुधवारी पावसाने उघडीप दिली.

नाल्यात वाहून गेल्यानं तरुणाचा मृत्यूसोलापूर : मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसात दुचाकीवरून घरी परतणारा दुचाकीस्वार कुंभार वेस येथील नाल्यात दुचाकीसह वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. दोन्ही मित्रांनी त्याला नाल्यातून बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले. सलाम साबीर दलाल (वय ३५, मंगळवार बाजार, सोलापूर) असे या तरुणाचे नाव आहे. 

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र