‘संस्काराचे मोती’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: June 30, 2015 03:36 IST2015-06-30T03:36:43+5:302015-06-30T03:36:43+5:30
लोकमतने सुरू केलेल्या ‘संस्काराचे मोती जरा हटके’ या पानाला बालचमूंचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यातील प्रथम कुपन स्पर्धा येत्या १ जुलैपासून (बुधवार) सुरू होत आहे.

‘संस्काराचे मोती’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई : लोकमतने सुरू केलेल्या ‘संस्काराचे मोती जरा हटके’ या पानाला बालचमूंचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यातील प्रथम कुपन स्पर्धा येत्या १ जुलैपासून (बुधवार) सुरू होत आहे. कुतूहल, कल्पकता आणि नावीन्याचा ध्यास मुलांमध्ये रुजवण्यासाठी ‘संस्काराचे मोती जरा हटके’मध्ये अनेक हटके कॉलम आहेत. तसेच संस्काराचे मोती स्पर्धेद्वारे मुलांच्या ‘जरा हटके’ विचारांना चालना देण्याचा प्रयत्न या माहितीद्वारे करण्यात येत आहे. १ जुलैपासून सुरू होणारी ही कुपन स्पर्धा १० आॅक्टोबरपर्यंत असेल. यातील विजेत्यांना हवाईसफर घडणार असून, इतरही अनेक आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आहे. यापूर्वीच्या विजेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना भेटण्याची संधी मिळाली होती. हवाईसफर, दिल्लीदर्शन तसेच नामवंत लोकांच्या भेटीने ही मुले भारावूनही गेली होती. यंदाही अशीच भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यंदा प्रथमच ही स्पर्धा खुली ठेवण्यात आली असून, राज्यातील सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येईल.
लकी ड्रॉमध्ये ३६ भाग्यशाली विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल. यामध्ये लॅपटॉप, सायकल, स्मार्टफोन आणि टॅब जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविणाऱ्या प्रथम १२ शाळांना प्रोजेक्टर मिळेल. शिवाय स्पर्धेतील प्रत्येक शाळेतील प्रथम विजेत्यांना खेळण्यातील हेलिकॉप्टर, द्वितीय विजेत्यांना वॉल कार आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना टिफिन बॉक्स मिळेल. तसेच १० उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रमाणपत्रासह बक्षिसांचा लाभ घेता येईल. (विशेष प्रतिनिधी)