शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

Sanjay Raut : "जिन्नांचा आत्मा तुमच्यात बसलाय, नव्या मुल्लांनी मला शिकवू नये"; संजय राऊतांचा हल्लाबोल

By संतोष कनमुसे | Updated: April 3, 2025 18:28 IST

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

Sanjay Raut ( Marathi News ) :"तुम्ही खुश दिसत आहात, पण मुसलमानांची इतकी काळजी तर पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिन्नांनाही नव्हती. जिन्नांचा आत्मा उठून तुमच्यात बसला आहे का?, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत भाजपावर केली.  लोकसभेत काल मध्यरात्री वक्फ दुरुस्ती विधेयक पास झाले.  या विधेयकावर आता राज्यसभेत चर्चा सुरू आहे.  खासदार राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

वक्फ विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर नितीश कुमारांना पहिला झटका, वरिष्ठ नेत्याने दिला राजीनामा

खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी हिंदुत्वाचा नारा दिला असला तरी आता तेच वक्फ बोर्डासंदर्भात मुसलमानांसाठी विशेष काळजी घेत आहेत.  मला वाटायचं आम्ही हिंदू राष्ट्र बनवणार आहोत. पण आता गरीब मुसलमानांची काळजी घेण्याचा नवा अजेंडा सुरू आहे. एकेकाळी तुम्ही मंगळसूत्र. गाय, बैल मुसलमानांकडे जातील म्हणून आक्षेप घेत होतता पण आता तुम्हीच स्वत: हिदुत्वाचे नवीन मुल्ला बनले आहात, असा टोला राऊतांनी लगावला. 

जमीन घोटाळ्याचा आरोप

यावेळी खासदार संजय राऊत यांनी भाजपावर अयोध्येतील जमीन घोटाळ्यावरुन निशाणा साधला. अयोध्येत जमीन घोटाळा झाला आहे. तु्म्ही हिंदूंच्या जमिनीच्या रक्षा करत नसाल तर मुसलमानांची काय करणार?, असा सवालही राऊतांनी केला. तुमच्या सरकारला जमीन विक्री करायची आहे, असंही राऊत म्हणाले. 

"अयोध्येत १३ हजार एकर जमीन घोटाळा झाला आहे. केदारनाथमध्ये ३०० किलो सोनं गायब झाले आहे. धारावीतही जमिनीचे तेच होणार आहे. जर तुम्हाला जमिनीची काळजी असेल तर आमच्या काश्मीरी पंडीतांना अजूनही घर मिळालेले नाही त्यांची काळजी करा. लडाखमध्ये चीन कब्जा तकुन बसले आहे. चीनने घेतलेल्या जमिनीची काळजी करा, असा निशाणा संजय राऊत यांनी लगावला. तुम्ही गोड गोड बोलता पण तुम्ही व्यापारी लोक आहात. व्यापारी लोक असंच करतात आणि सगळ विकून बाहेर पळून जातात मेहूल चोक्सी, विजय मल्ल्या हे तुमचेच लोक आहेत. तुम्ही देशात पुन्हा एकदा दंगे भडकवत आहात हे सगळं बंद करा, असंही खासदार राऊत  म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतwaqf board amendment billवक्फ बोर्डShiv SenaशिवसेनाBJPभाजपा