स्पिफी स्पॅरो क्लब विजेता

By Admin | Updated: June 11, 2016 01:44 IST2016-06-11T01:44:49+5:302016-06-11T01:44:49+5:30

व्हीसीटी २०१६ चषक टष्ट्वेंटी- २० क्रिकेट स्पर्धेत स्पिफी स्पॅरो क्लब संघाने अ‍ॅग्री इगल्स इलेव्हन क्लब संघाचा पराभव करीत विजेतेपद प्राप्त केले

Spifi Sparrow Club Winners | स्पिफी स्पॅरो क्लब विजेता

स्पिफी स्पॅरो क्लब विजेता


पिंपरी : व्हीसीटी २०१६ चषक टष्ट्वेंटी- २० क्रिकेट स्पर्धेत स्पिफी स्पॅरो क्लब संघाने अ‍ॅग्री इगल्स इलेव्हन क्लब संघाचा पराभव करीत विजेतेपद प्राप्त केले. स्पर्धा गहुंजे येथील व्हीडीआर मैदान येथे झाली.
छत्रपती राजाराम मंडळ, राहुलदादा तरस युवा मंडळ यांच्या वतीने झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अ‍ॅग्री इगल्स संघाने २० षटकांत सर्व बाद १२३ धावा केल्या.
विराज काकडेने १७ चेंडूंत २९, ताहीर मोहंमदने २२ आणि आदित्य कदमने १८ धावा करीत चांगली फलंदाजी केली. स्पिफी स्पॅरो संघाच्या गोलंदाज मयूर टिंगरे याने ४ षटकांत २१ धावा देत ४ गडी बाद केले. विशाल सायलूने ४ षटकांत २७ धावांत २ आणि महेश शिंदेने ४ षटकांत २३ धावांत २ गडी
टिपले.
विजयासाठी १२४ धावांचे आव्हान घेऊन फलंदाजीस उतरलेल्या स्पिफी स्पॅरो संघाने १८.४ षटकांत ६ गडी गमावत १२६ धावा करीत सहज विजय मिळविला. अभिषेक आनंद याने ३४ धावांत ४५, सूरज शिंदेने ३३ चेंडूंत ३४ आणि इम्राण पठाणने २३ चेंडूंत ३३ धावा करीत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
इगल्स संघाचा गोलंदाज कुशाल टिंगरेने ३ षटकांत १६ धावा देत ३ गडी बाद केले. योगेश चव्हाणने ४ षटकांत २४ धावांत २ गडी टिपले. (प्रतिनिधी)
>शिंदे स्पर्धेचा मानकरी
सामन्याचा मानकरी किताब मयूर टिंगरे याने मिळविला. महेश शिंदे स्पर्धेचा मानकरी ठरला. नौशाद शेख उत्कृष्ट फलंदाज, समीर सिंग उत्कृष्ट गोलंदाज आणि इम्रान शेख षटकाराचा मानकरी ठरला. बक्षीस वितरण महाराष्ट्र संघाचे माजी कर्णधार शंतनू सुगवेकर व युवराज निंबाळकर यांच्या हस्ते झाले.

Web Title: Spifi Sparrow Club Winners