द्रुतगती महामार्गावर जीप अपघातात चालक ठार
By Admin | Updated: October 24, 2016 00:05 IST2016-10-23T23:57:56+5:302016-10-24T00:05:11+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अमृतांजन पुलाच्या खाली सुरक्षा दुभाजकावर भरधाव जीप धडकून झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यु

द्रुतगती महामार्गावर जीप अपघातात चालक ठार
>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 23 - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अमृतांजन पुलाच्या खाली सुरक्षा दुभाजकावर भरधाव जीप धडकून झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. आज रविवारी रात्री ११:२० वाजता हा अपघात झाला.
खंडाळा महामार्ग पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी विना नंबरची नुकतीच शोरुम मधून आणलेली गाडी अमृतांजन पुलाच्या खालील दोन्ही लेनच्यामध्ये असलेल्या सुरक्षा भिंतीच्या कठड्याला भरधाव वेगात धडकल्याने गाडीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला असून चालक जागीच ठार झाला.