शौचालय बांधकामांतून हगणदारीमुक्तीला वेग
By Admin | Updated: September 29, 2015 01:59 IST2015-09-29T01:59:53+5:302015-09-29T01:59:53+5:30
राज्याला हगणदारीमुक्ती हा शब्द देणाऱ्या नगर जिल्ह्यात हागणदारीमुक्तीचा वेग वाढत आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या संकेतस्थळावर दररोज

शौचालय बांधकामांतून हगणदारीमुक्तीला वेग
ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर
राज्याला हगणदारीमुक्ती हा शब्द देणाऱ्या नगर जिल्ह्यात हागणदारीमुक्तीचा वेग वाढत आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या संकेतस्थळावर दररोज भरण्यात येणाऱ्या आॅनलाइन माहितीतून ही बाब समोर आली आहे. शौचालय बांधकामात राज्यात पुणे जिल्हा एक नंबर असून त्या खालोखाल सातारा आणि कोल्हापूर असून चौथ्या स्थानावर नगर आहे.
जिल्ह्यात हागणदारीमुक्ती प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय पेयजल आणि स्वच्छता विभागाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी शौचालय बांधण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. बेसलाइन सर्वेक्षणातून शिल्लक राहिलेल्या कुटुंबांची नावे या बेसलाइनमध्ये टाकण्यासाठी जिल्ह्णात मोहीम राबवण्यात आली. यासाठी ८ सप्टेंबर ही अखेरची मुदत देण्यात आली होती. यासाठी गावा-गावात दवंडी देण्यात येवून प्रत्येक कुटुंबाला शौचालय नसणाऱ्याच्या बेसलाईन सर्वेक्षणात नाव टाकण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासह ज्या ठिकाणी शक्य आहे, अशा ठिकाणी शौचालय बांधून घेण्यात येत आहे. बांधण्यात आलेल्या या शौचालयाची माहिती केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येत आहे. यात टक्केवारीत तांत्रिक दृष्ट्या नगर जिल्हा १५ व्या क्रमांकावर दिसत आहे. नगर राज्यात चौथ्या स्थानावर आहे.