मेट्रो रेल्वेला गती
By Admin | Updated: July 13, 2014 00:55 IST2014-07-13T00:55:13+5:302014-07-13T00:55:13+5:30
नागपुरातील मेट्रो रेल्वेसंबंधात केंद्र सरकारच्या विविध विभागांद्वारे मागण्यात आलेल्या माहितीचा पूर्ण रिपोर्ट राज्य सरकारने तयार केला आहे. आठवडाभरात हा रिपोर्ट केंद्र सरकारला उपलब्ध करून दिला जाईल.

मेट्रो रेल्वेला गती
आठवडाभरात केंद्राला पाठवणार रिपोर्ट : महिनाभरात मंजुरीची शक्यता
नागपूर : नागपुरातील मेट्रो रेल्वेसंबंधात केंद्र सरकारच्या विविध विभागांद्वारे मागण्यात आलेल्या माहितीचा पूर्ण रिपोर्ट राज्य सरकारने तयार केला आहे. आठवडाभरात हा रिपोर्ट केंद्र सरकारला उपलब्ध करून दिला जाईल. त्यानंतर केंद्र सरकारच्या कॅबिनेटची मंजुरी आवश्यक राहील. सर्वकाही ठीक राहिले तर महिनाभरात मेट्रो रेल्वेचे भूमिपूजन निश्चित होऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या मेट्रो रेल्वेला केंद्र सरकारच्या नगररचना विभागाची मंजुरी फेब्रुवारीमध्ये मिळाली. त्यानंतर मार्चच्या सुरुवातीपासूनच आचारसंहिता लागू झाली. मेच्या अंतिम आठवड्यात केंद्रात नवीन सरकार स्थापन झाले. त्यानंतर महिनाभर मेट्रोकडे कुणीही लक्ष दिले नाही. केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी पुन्हा एकदा मेट्रोच्या फाईलला गती मिळाली. नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र)च्या मार्गदर्शनात मेट्रो रेल्वेच्या बांधकामाला सुरुवात होईल. केंद्रातील रेल्वे, हायवे, फायनान्स, रस्ते आणि वित्त विभागासह विविध विभागांना मेट्रो प्रकल्पाबाबत काही शंका होत्या. त्यामुळे त्यांनी याबाबत वेगवेगळ्या माहितीची एक रिपोर्ट तयार करून ती राज्य सरकारकडे पाठविला होता. राज्य सरकारने त्याची त्वरित दखल घेऊन नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे यांना याबाबत द्यावयाच्या माहितीचा रिपोर्ट तयार करण्यास सांगितले. त्यांनी केंद्र सरकारला आवश्यक असलेल्या माहितीचा रिपोर्ट तयार करून राज्य शासनाकडे पाठविला आहे. राज्य सरकार एक आठवड्यात केंद्र सरकारकडे हा अहवाल पाठविणार आहे. (प्रतिनिधी)