गृहनिर्माण कामांना गती द्या - मुख्यमंत्री

By Admin | Updated: July 11, 2017 05:22 IST2017-07-11T05:22:26+5:302017-07-11T05:22:26+5:30

गृहनिर्माण विभागांतर्गत असलेल्या विविध कार्यालयाची सुरु असलेली कामे त्वरीत पूर्ण करा

Speed ​​up housing work - Chief Minister | गृहनिर्माण कामांना गती द्या - मुख्यमंत्री

गृहनिर्माण कामांना गती द्या - मुख्यमंत्री

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गृहनिर्माण विभागांतर्गत असलेल्या विविध कार्यालयाची सुरु असलेली कामे त्वरीत पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते आज मंत्रालयात आयोजित गृहनिर्माण विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर उपस्थित होते.
फडणवीस यांनी बीडीडीचे पुनर्वसन, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची कामे, संरक्षण दल आणि रेल्वेच्या रिकाम्या जागेचा वापर, गृहनिर्माण धोरण, माहिम नेचर पार्क, विविध कार्यालयांच्या कार्यपद्धतीचे सुलभीकरण, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या कायद्यात दुरुस्ती करणे आदींचा आढावा घेतला.

Web Title: Speed ​​up housing work - Chief Minister