संभाजी ब्रिगेडची राष्ट्रवादीशी बोलणी

By Admin | Updated: January 24, 2017 22:41 IST2017-01-24T22:41:37+5:302017-01-24T22:41:37+5:30

अकोला : अकोला महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये बोलणी सुरू असताना समविचारी असलेल्या संभाजी ब्रिगेडनेही राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू केली आहे.

Speech of Sambhaji Brigade NCP | संभाजी ब्रिगेडची राष्ट्रवादीशी बोलणी

संभाजी ब्रिगेडची राष्ट्रवादीशी बोलणी

मनपा प्रभाग १५ आणि सहामध्ये लढणार ब्रिगेडचे उमेदवार

अकोला : अकोला महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये बोलणी सुरू असताना समविचारी असलेल्या संभाजी ब्रिगेडनेही राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू केली आहे. महापालिकेतील दोन जागा ब्रिगेडने मागितल्या असून, त्यांचा प्रस्ताव विचाराधीन आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडचे अकोल्यातील जिल्हाध्यक्ष पंकज जायले यांना विचारणा केली असता, त्यांनी अशी बोलणी सुरू असल्याची माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अजय तापडिया यांच्याशी संपर्क साधला असता, संभाजी ब्रिगेडने महापालिका प्रभाग क्रमांक १५ आणि प्रभाग क्रमांक सहा सोडण्याची विनंती केली आहे. त्यांचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींच्या विचाराधीन असून, सकारात्मक विचार सुरू असल्याची माहिती दिली.

Web Title: Speech of Sambhaji Brigade NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.