पुणे, मुंबईसाठी विशेष रेल्वेगाड्या
By Admin | Updated: September 19, 2014 00:56 IST2014-09-19T00:56:49+5:302014-09-19T00:56:49+5:30
सुट्यांमध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने सर्वाधिक गर्दीच्या पुणे, उधना आणि मुंबई मार्गावर विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे, मुंबईसाठी विशेष रेल्वेगाड्या
प्रवाशांसाठी सुविधा : सुट्यांमधील गर्दी पाहून निर्णय
नागपूर : सुट्यांमध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने सर्वाधिक गर्दीच्या पुणे, उधना आणि मुंबई मार्गावर विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०१२३६ नागपूर-पुणे साप्ताहिक एक्स्प्रेस नागपूरवरून १५ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक बुधवारी सकाळी ११ वाजता सुटून ही गाडी पुण्याला दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी ५.१० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०१२३५ पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी पुण्यावरून १६ आॅक्टोबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक गुरुवारी सकाळी ६.१५ वाजता सुटून नागपूरला त्याच दिवशी रात्री १०.१० वाजता पोहोचेल. या गाड्यांना वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, दौंड येथे थांबा देण्यात आला आहे. याशिवाय नागपूर-मुंबई दरम्यान आठ साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. रेल्वेगाडी क्रमांक ०१०१४ नागपूर-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ही गाडी नागपूरवरून १९ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक रविवारी दुपारी ४.१५ वाजता सुटून मुंबईला दुसऱ्या दिवशी सकाळी ८.१५ वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०१०१३ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस-नागपूर साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी मुंबईवरून १९ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक रविवारी मध्यरात्री १२.२० वाजता सुटून नागपूरला दुपारी ३ वाजता पोहोचेल. या गाड्यांना वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, नासिक, इगतपुरी, कल्याण, ठाणे, दादर येथे थांबा देण्यात आला आहे. याशिवाय नागपूर-उधना चार विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. रेल्वेगाडी क्रमांक ०१४५३ नागपूर-उधना साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी नागपूरवरून २४ सप्टेबर ते १ आॅक्टोबर दरम्यान नागपूरवरून दुपारी ३ वाजता सुटून उधनाला दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१५ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०१४५४ उधना-नागपूर साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी २५ सप्टेबर ते २ आॅक्टोबर दरम्यान सकाळी ६ वाजता सुटून नागपूरला रात्री १०.२० वाजता पोहोचेल. या गाड्यांना वर्धा, पुलगाव, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, अमळनेर, नंदूरबार येथे थांबा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)