महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोकण रेल्वेच्या विशेष ट्रेन

By Admin | Updated: November 29, 2014 01:37 IST2014-11-29T01:37:25+5:302014-11-29T01:37:25+5:30

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेकडून अनारक्षित विशेष ट्रेन सोडण्यात आल्या असतानाच आता रेल्वेमंत्र्यांच्या सूचनेनुसार कोकण रेल्वेकडूनही विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत.

Special Trains of Konkan Railway on the occasion of Mahaparinwariya Dynasty | महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोकण रेल्वेच्या विशेष ट्रेन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोकण रेल्वेच्या विशेष ट्रेन

मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेकडून अनारक्षित विशेष ट्रेन सोडण्यात आल्या असतानाच आता रेल्वेमंत्र्यांच्या सूचनेनुसार कोकण रेल्वेकडूनही विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. मडगाव ते सीएसटी आणि सीएसटी ते रत्नागिरी अशा सेवा असल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले. 
मडगाव-सीएसटी गाडी 5 डिसेंबरला मडगावहून 9.40 वाजता सुटून सीएसटी येथे त्याच दिवशी रात्री 11.15 वाजता पोहोचेल. तर सीएसटी-मडगाव गाडी 7 डिसेंबर रोजी सीएसटी येथून 7.30 वाजता सुटून मडगाव येथे त्याच दिवशी रात्री 9 वाजता पोहोचेल. या ट्रेनला दादर, ठाणो, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, 
थिविम करमाळी येथे थांबा देण्यात येणार आहे. ही ट्रेन 12 डब्यांची 
असेल. 
सीएसटी-रत्नागिरी ही गाडी 6 डिसेंबर रोजी सीएसटी येथून मध्यरात्री 12.20 वाजता सुटून रत्नागिरी येथे सकाळी 7 वाजता पोहोचेल. रत्नागिरी-सीएसटी ही गाडी 6 डिसेंबर रत्नागिरी येथून सायंकाळी 5 वाजता सुटून सीएसटी येथे दुस:या दिवशी मध्यरात्री 12.30 वाजता पोहोचेल. या ट्रेनला दादर, ठाणो, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण आणि संगमेश्वर येथे थांबा देण्यात आला आहे. ही ट्रेन 12 डब्यांची असेल, 
असे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Special Trains of Konkan Railway on the occasion of Mahaparinwariya Dynasty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.