पश्चिम रेल्वेकडून विसर्जनानिमित्त विशेष लोकल
By Admin | Updated: September 20, 2015 00:28 IST2015-09-20T00:28:49+5:302015-09-20T00:28:49+5:30
गणपती विसर्जनानंतर रात्री उशिरा परतणाऱ्या भाविकांची समस्या लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे २७ आणि २८ सप्टेंबरच्या मध्यरात्री विशेष लोकल सोडणार आहेत. एकूण आठ विशेष लोकल

पश्चिम रेल्वेकडून विसर्जनानिमित्त विशेष लोकल
मुंबई : गणपती विसर्जनानंतर रात्री उशिरा परतणाऱ्या भाविकांची समस्या लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे २७ आणि २८ सप्टेंबरच्या मध्यरात्री विशेष लोकल सोडणार आहेत. एकूण आठ विशेष लोकल सोडण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.
डाऊनला जाणाऱ्या लोकलमध्ये चर्चगेटवरून विरारच्या दिशेला जाणारी पहिली लोकल रात्री १ वाजून १५ मिनिटांनी सुटेल व रात्री २ वाजून ४७ मिनिटांनी विरारला पोहोचेल. दुसरी विशेष लोकल रात्री १ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल व ३ वाजून ३३ मिनिटांनी विरारला पोहोचेल. त्यानंतर तिसरी विशेष लोकल २ वाजून २५ मिनिटांनी सुटून पहाटे ४ वाजता विरारला पोहोचेल. तर चौथी लोकल ३ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि पहाटे ४ वाजून ५५ मिनिटांनी विरारला पोहोचेल, अशी माहिती देण्यात आली.
अपला जाणाऱ्या लोकलमध्ये चर्चगेटच्या दिशेने जाणारी लोकल रात्री १ वाजून १५ मिनिटांनी विरारहून सुटेल आाणि रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी चर्चगेटला पोहोचेल. तर दुसरी लोकल रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी विरारहून सुटून २ वाजून ४७ मिनिटांनी चर्चगेटला पोहोचेल. तिसरी लोकल २ वाजून ४० मिनिटांनी सुटेल व ३ वाजून १२ मिनिटांनी तर चौथी विशेष लोकल २ वाजून ५५ मिनिटांनी सुटून ४ वाजून ३० मिनिटांनी चर्चगेटला पोहोचेल. विशेष म्हणजे या लोकल सर्व उपनगरीय स्थानकांवर थांबतील.