शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ १५ निर्णय; मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, लोकल ट्रेन खरेदी, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर
2
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार; NCP ची तातडीची बैठक, राजकीय हालचाली वाढल्या
3
फिटनेस टेस्ट पास झाला! आता हा ठरू शकतो हिटमॅनच्या वाटेतील सर्वात मोठा अडथळा; इरफान पठाण म्हणाला...
4
किम जोंग उनची १२ वर्षांची मुलगी जगभरात चर्चेत! वडिलांसोबत चीनमध्ये का गेली किम जू?
5
Chanakya Niti: चाणक्यनीतीनुसार, संसारात 'या' पाच गोष्टी असतील तर नवरा बायकोचा घटस्फोट कधीच होणार नाही
6
'या' तीन देशांमधून भारतात येणाऱ्या अल्पसंख्याकांना पासपोर्टशिवाय राहण्याची परवानगी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
"कुठल्याही जातीला उचलून...! 'हा' अधिकार कुठल्याही सरकारला नाही, आम्ही न्यायालयात जाणार"; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
8
k Kavitha: वडिलांनी पक्षातून हाकललं, मुलीने आमदारकीवर लाथ मारली; बीआरएसमधील वाद टोकाला
9
बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार, कधी सुरू होणार; अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
महागडी कार, लग्झरी फ्लॅट अन् बरेच काही...; श्रीमंतीच्या मायाजाळात कसा अडकतोय 'कॉमन मॅन'?
11
मध्यरात्री पीजीमध्ये शिरला मास्कमॅन; तरुणीचे हात-पाय बांधले अन्...; धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ
12
सणासुदीपूर्वी सोन्याच्या दरात जोरदार तेजी, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार? चांदीचे दर काय?
13
टीआरएफला मलेशिया मार्गे पैसा मिळतोय, लाखो रुपये झाले जमा; एनआयएच्या तपासात उघड
14
सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर
15
“मराठा आरक्षणात CM फडणवीसांचा सिंहाचा वाटा, लक्ष्मण हाकेंनी लुडबूड करू नये”: विखे-पाटील
16
भारताचा 'मोस्ट वॉन्टेड' गँगस्टर बादली अखेर पोलिसांच्या ताब्यात! कंबोडियावरून आणले भारतात
17
Nifty थेट शून्यावर, झिरोदामध्ये तांत्रिक बिघाड; नितीन कामथ झाले ट्रोल
18
ITR फाईल करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंतच संधी! अन्यथा भरावा लागेल इतक्या रुपयांपर्यंत दंड
19
"सध्या कमबॅक करणार नाही...", दोन मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीचा निर्णय; लग्नाआधीच झालेली प्रेग्नंट
20
“मनोज जरांगेंना अपेक्षित झालेले नाही, शेवटच्या क्षणी...”; वकील असीम सरोदेंचा मोठा दावा

विशेष: अक्षरांना प्राणतत्त्व देणारे गुरू डॉ. विठ्ठल वाघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 14:56 IST

काव्य रसात्मक असले पाहिजे, कविता कागदासाठी नसते, कविता माणसाचं दु:ख मांडण्यासाठी, ते हलकं करण्यासाठी असते.

ग्रामसंस्कृती आणि शेती हा अर्थार्जनाचा एकमेव व्यवसाय. या पार्श्वभूमीवर मी १९७०च्या आसपास लिहिता झालो. लेखनाची आणि संवादाची वाट शोधत अंबाजोगाईपासूनच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पदरची भाकरी घेऊन हजेरी लावली. तेव्हा कुठं थोडी फार वाट सापडली. परंतु १९८१ ला श्रीरामपूर येथे शब्दालय प्रकाशनाच्या वर्धापन दिनात डॉ. विठ्ठल वाघ यांची थेट मनाला भिडणारी कविता ऐकून भारावून गेलो आणि गुरू सापडल्याचे समाधान अक्षर झाले. 

काव्य रसात्मक असले पाहिजे, कविता कागदासाठी नसते, कविता माणसाचं दु:ख मांडण्यासाठी, ते हलकं करण्यासाठी असते. ईश्वराचा साक्षात्कार निसर्गच आहे. कृषकांनी आता आक्रमक झाले पाहिजे, या सगळ्या गोष्टी माहिती होत गेल्या. सर्वांत महत्त्वाचं कागदावरच्या अक्षरांना प्राणतत्त्व देऊन आशयाची आकृती रसिकांपुढे उभी राहिली पाहिजे, हे बापूंच्या (विठ्ठल वाघ यांच्या) कविता सादरीकरणातून अवगत  होत गेले. 

बैल घराची श्रीमंतीबैल दारचे वैभवबैल माझ्या घरातलापिढ्यापिढ्यांचा उत्सव (बैल)

आम्ही मेंढरं मेंढरंयावं त्यानं हाकलावंपाचा वर्साच्या बोलीनंहोते आमचा लिलाव

काया मातीत मातीततिफन चालतेइज नाचते थयथयढग ढोल वाजवते...

भाषेची मौलिकता, मौखिकता असते. ही मौखिकता समूहाशी संवाद साधते. मी का लिहितो? त्या परिसराने माझा पिंड पोसला, त्या परिसराची जाणीव, वेदना माझ्या लेखनात आहे काय? तू काळाचे प्रतिनिधित्व करणार आहेस का? वर्तमानाशी संवाद असणे गरजेचे आहे. या सर्व जाणिवा मला प्रकर्षाने बापूंच्या कवितेने दिल्या. कवीचा स्वर हा कवितेसाठी मातृस्वर आहे. ये हृदयीचे ते हृदयी घातिले, हे सामर्थ्य त्या स्वरांमध्ये असते. तसेच मुक्तछंदाच्या शापातून जर मराठी कवितेला सोडवायचे असेल तर कवितेला समूहसंवेदी आणि लयीची नितांत गरज आहे. स्वर अक्षरांना अमरत्व देतो. या सर्वांचा साक्षात्कार बापूंच्या कवितेतून झाला. त्यामुळेच जाणतेपणाने गुरू अभ्यासावा, ही जाण माझे ठायी आली. थेट विठ्ठलाशी भांडण्याचं धारिष्ट्य मला मिळालं.

काय रे तू माझी, वाहशील चिंतातूजशीस दाता, मी शेतकरीतुझीच गा चिंता, मी वाहतो रातंदिनतुज पायी अन्न, उभवितोकाय तू ही तिथे, उभा विटेवरीअरे इथे पंढरी, काळीमाय

टॅग्स :LokmatलोकमतMaharashtraमहाराष्ट्र