हत्याकांड तपासासाठी विशेष दल नेमा
By Admin | Updated: October 26, 2014 01:40 IST2014-10-26T01:40:45+5:302014-10-26T01:40:45+5:30
दलित हत्याकांडाच्या चौकशीस विशेष कृती दल स्थापनेचे आदेश राज्यपाल सी़ विद्यासागर राव यांनी पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांना शनिवारी दिले.

हत्याकांड तपासासाठी विशेष दल नेमा
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा खालसा येथे मंगळवारी झालेल्या दलित हत्याकांडाच्या चौकशीस विशेष कृती दल स्थापनेचे आदेश राज्यपाल सी़ विद्यासागर राव यांनी पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांना शनिवारी दिले.
खा़ रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाच्या एका शिष्टमंडळाने राज्यपालांची राजभवन येथे भेट घेतली़ त्यानंतर राज्यपालांनी पोलीस महासंचालकांना हे आदेश दिले.
हत्याकांडातील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना शासनाने 3.75 लाखांची मदत पोहोचवली असल्याची माहिती राज्यपालांनी दिली. राज्यातील दलित अत्याचाराच्या घटनांचा आढावा
घेऊन अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आपण लवकरच एक उच्चस्तरीय बैठक बोलावणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले. (प्रतिनिधी)