सीमेवरील जवानांसाठी खास ‘फराळ’ भेट

By Admin | Updated: October 31, 2016 02:42 IST2016-10-31T02:42:05+5:302016-10-31T02:42:05+5:30

देशसेवेसाठी अहोरात्र सीमेवर लढणाऱ्या जवानांना सणासुदीच्या दिवसातही घरी येता येत नाही.

Special 'snacks' gift to the border soldiers | सीमेवरील जवानांसाठी खास ‘फराळ’ भेट

सीमेवरील जवानांसाठी खास ‘फराळ’ भेट


मुंबई : देशसेवेसाठी अहोरात्र सीमेवर लढणाऱ्या जवानांना सणासुदीच्या दिवसातही घरी येता येत नाही. अशा जवानांना दिवाळीचा आनंद लुटता यावा यासाठी भांडुप येथील गणेशोत्सव मंडळाने दिवाळीचा फराळ खास सैनिकांना भेट म्हणून दिला.
भांडुप पश्चिम येथील विकास मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्रीनगर सीमेवरील जवानांसाठी लाडू, करंज्या, चकली, चिवडा अशा फराळांची तब्बल १ हजार पाकिटे पाठवली आहेत. दिवाळीत फटाके आणि डीजेचा खर्च करण्यापेक्षा सामाजिक कार्यातून लहानांसमोर आदर्श निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तमाम नागरिक जवानांच्या सदैव पाठीशी आहेत. ही आपुलकी व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.

Web Title: Special 'snacks' gift to the border soldiers