सरसंघचालकांना विशेष सुरक्षा

By Admin | Updated: August 12, 2015 02:36 IST2015-08-12T02:36:12+5:302015-08-12T02:36:12+5:30

अतिरेकी संघटनांच्या हिटलिस्टवर असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आजपासून २४ तास विशेष समूहाच्या ‘झेड प्लस’ सुरक्षा कवचात राहणार आहेत.

Special protection to the Sarasanghachalak | सरसंघचालकांना विशेष सुरक्षा

सरसंघचालकांना विशेष सुरक्षा

नागपूर : अतिरेकी संघटनांच्या हिटलिस्टवर असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आजपासून २४ तास विशेष समूहाच्या ‘झेड प्लस’ सुरक्षा कवचात राहणार आहेत. त्यांच्यासकट संघ मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) डझनभर अधिकाऱ्यांसह सुमारे १२५ कमांडोचा ताफा मंगळवारी संघ मुख्यालयात दाखल झाला.
सरसंघचालकांसह नागपुरातील संघ मुख्यालयसुद्धा विविध अतिरेकी संघटनांच्या हिटलिस्टवर आहे. यापूर्वी संघ मुख्यालयावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ल्याचा प्रयत्नदेखील केला आहे. या हल्ल्यानंतर संघ मुख्यालय आणि सरसंघचालकांच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष सुरक्षा पथकावर (एसपीयू) सोपविण्यात आली होती. गुप्तचर यंत्रणांच्या संकेतानुसार, भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करून त्यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

अत्याधुनिक शस्त्रे, बुलेटप्रूफ वाहन
अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेले सीआयएसएफचे कमांडो कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यात निष्णात असतात. मंगळवारी दाखल झालेल्या या पथकाकडे एके ४७ / ५६, इन्सांस, एमपी -५ मशीनगनसारखी अत्याधुनिक शस्त्रे तसेच अत्याधुनिक संपर्क यंत्रणा आहे. भागवत यांच्यासाठी लवकरच बुलेटप्रूफ बीएमडब्ल्यू कार येणार आहे.

Web Title: Special protection to the Sarasanghachalak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.