डेंग्यू रोखण्यासाठी विशेष कार्यक्रम
By Admin | Updated: September 17, 2014 23:55 IST2014-09-17T23:55:39+5:302014-09-17T23:55:39+5:30
डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाबरोबर नवनिर्वाचित महापौरांनीही पुढाकार घेतला आहे.

डेंग्यू रोखण्यासाठी विशेष कार्यक्रम
पुणो : डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाबरोबर नवनिर्वाचित महापौरांनीही पुढाकार घेतला आहे. या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून 15 दिवसांचा विशेष कृती आराखडा तयार केला जाणार आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी प्रशासनाची बैठक घेतली. तसेच नागरिकांनी शहरातील डेंग्यूबाबत माहिती महापालिकेस कळवावी, यासाठी प्रशासनाकडून आजपासून 24 तास हेल्पलाईन सेवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती महापौर धनकवडे यांनी दिली.
संपूर्ण शहरात डेंग्यूची साथ आली असून, दिवसेंदिवस डेंग्यूच्या पेशंटची संख्या वाढत आहे. गेल्या नऊ महिन्यांत डेंग्यूच्या पेशंटची संख्या 2 हजार 163च्या घरात आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आज बैठक घेण्यात आली.
अतिरिक्त महापालिका आयुक्त राजेंद्र जगताप यांच्यासह आरोग्य विभागातील सर्व प्रमुख अधिकारी या वेळी उपस्थित होते. बैठकीत डेंग्यूच्या निवारणासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. डेंग्यूच्या जनजागृतीबाबत राबविल्या जाणा:या मोहिमेत शालेय विद्याथ्र्यानी सहभाग घ्यावा, यासाठी क्षेत्रीय वैद्यकीय अधिका:यांनी आपल्या हद्दीतील शाळांमध्ये द्याव्यात. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती थांबविण्यासाठी आरोग्य अधिका:यांनी भवन रचना, शिक्षण मंडळ यांच्या मदतीने जागोजागी भेटी देऊन त्याचे सर्वेक्षण करावे, असे आदेश या बैठकीत प्रशासनास देण्यात आले आहेत. तसेच डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजना करून त्याचा सविस्तर अहवाल पुढील दहा दिवसांत महापौर कार्यालयाकडे सादर करावेत, अशा सूचनाही देण्यात आल्याचे धनकवडे यांनी सांगितले.
शहरातील सर्व भागांत धूरफवारणी करण्यात यावी, डास उत्पत्तीला कारणीभूत ठिकाणांची पाहणी करून सर्वेक्षण करावे, डास उत्पत्तीसाठी कारणीभूत ठरणा:या भंगार साहित्याचा तातडीने लिलाव करण्यात यावा आणि डेंग्यू नियंत्रणासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनाही देण्यात आल्याचे धनकवडे यांनी या वेळी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)
हेल्पलाइनची जबाबदारी अधिका:यांवर
प्रशासनाकडून डेंग्यूची माहिती देण्यासाठी 24 तास सुरू असणारी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी क्2क्-255क्8474 या क्रमांकावर नागरिकांना आपल्या तक्रारी नोंदविता येणार आहेत. डेंग्यूचे डास, पाण्याची साठलेली डबकी, डेंग्यूच्या पेशंटची माहिती या हेल्पलाइनवरून नागरिकांना महापालिकेस कळविता येणार आहे. तसेच या तक्रारींची दखल चोवीस तासांच्या आत घेतली जाणार असून, त्या न सोडविल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिका:यांवर असणार आहे.