लहानग्यांसाठी साकारतेय विशेष संग्रहालय
By Admin | Updated: May 18, 2016 05:11 IST2016-05-18T05:11:49+5:302016-05-18T05:11:49+5:30
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने खास लहानग्यांसाठी ‘किड्स म्युझियम’ साकारण्याचे ठरविले

लहानग्यांसाठी साकारतेय विशेष संग्रहालय
मुंबई : बऱ्याचदा म्युझियम पाहता-पाहता लहानग्यांना कंटाळा येतो, मात्र याच कंटाळ्यावर उत्तर शोधत
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने खास लहानग्यांसाठी ‘किड्स म्युझियम’ साकारण्याचे ठरविले आहे. संग्रहालयाच्या ३५०० चौरस फूट आवारात
साकारणारे देशातील हे खास लहानग्यांसाठीचे पहिलेच संग्रहालय असणार आहे.
देशातील विविध प्रदेशांतील पारंपरिक खेळण्यांचा समावेश यात असेल. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या नॅचरल हिस्ट्री दालनासमोर हे म्युझियम साकारण्यात येणार आहे. हॉवर्ड विद्यापाठातील वास्तुविशारद राहुल मल्होत्रा या म्युझियमची रचना करणार आहेत. त्यासाठी बँक आॅफ अमेरिकाने अर्थसाहाय्य केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज
वस्तुसंग्रहालयात १ हजार ५०० पारंपरिक खेळण्यांचा संग्रह आहे. हडप्पा-मोहेंजोदडो संस्कृतीतील ५०० वर्षे जुनी खेळणीही संग्रहालयाकडे आहे. ही खेळणी कागदाचा लगदा, कापड, लाकूड, माती अशी वेगवेगळ्या माध्यमांतील आहेत.
म्युझियममध्ये लहानग्यांना आकर्षित करण्यासाठी दालनांची रचना वेगळ्या पद्धतीने करण्यात येणार आहे. खेळता-खेळता शिक्षण देण्यात येईल. (प्रतिनिधी)
स्मार्ट फोन्स आणि तंत्रज्ञानामुळे गेल्या काही वर्षांपासून लहानग्यांची पिढी पारंपरिक खेळण्यांपासून दुरावते आहे. दुरावलेल्या लहानग्यांना पुन्हा भारतीय खेळण्यांच्या संस्कृतीकडे नेण्यासाठी ‘किड्स म्युझियम’ साकारण्यात येणार आहे. डिसेंबर २०१६पर्यंत हे म्युझियम उभारण्यात येईल.
- डॉ. मनीषा नेने, प्रकल्प संचालक, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय