आजपासून सुरू होणार विधिमंडळाचे विशेष अधिवेशन

By Admin | Updated: November 10, 2014 12:35 IST2014-11-10T10:29:07+5:302014-11-10T12:35:38+5:30

राज्यातील भाजपा प्रणित सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याकरता विधिमंडलाचे तीन दिवसांचे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे.

Special Legislative Assembly to begin today | आजपासून सुरू होणार विधिमंडळाचे विशेष अधिवेशन

आजपासून सुरू होणार विधिमंडळाचे विशेष अधिवेशन

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १० - राज्यातील भाजपा प्रणित सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याकरता विधिमंडलाचे तीन दिवसांचे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या दिवसीय अधिवेशनात सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार असून विधानसभा अध्यक्षांची निवडही होईल. माकपचे ज्येष्ठ आमदार जीवा पांडू गावित यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असून ते सर्व आमदारांना सदस्यत्वाची शपथ देतील. 
दरम्यान सत्तेत सहभागी व्हायचे की नाही याबाबत शिवसेनेने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार की नाही याबाबत भाजपाने भूमिका स्पष्ट न केल्यास आम्ही विश्वासदर्शक ठरावाविरोधात मतदान करू असे काल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. 
 

Web Title: Special Legislative Assembly to begin today