शपथविधी सोहळ्यासाठी खास सजावट

By Admin | Updated: October 30, 2014 02:06 IST2014-10-30T02:06:47+5:302014-10-30T02:06:47+5:30

राज्यातील भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर शपथ घेतील.

A special decoration for the swearing-in ceremony | शपथविधी सोहळ्यासाठी खास सजावट

शपथविधी सोहळ्यासाठी खास सजावट

200 मान्यवरांसाठी व्यासपीठ : भव्य एलईडी स्क्रीन, 3क्  हजार प्रेक्षकांची उपस्थिती 
मुंबई : राज्यातील भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर शपथ घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील दिग्गजांच्या उपस्थितीत होणारा हा शपथविधी सोहळा भव्यदिव्य आणि ऐतिहासिक बनविण्यासाठी खास सजावट करण्यात येणार आहे. 
‘लगान’, ‘देवदास’ आणि ‘जोधा अकबर’ यासारख्या चित्रपटांसाठी भव्यदिव्य सेट उभारणारे ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाईंकडे वानखेडेवरील सजावटीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या प्राचीन आणि अर्वाचीन इतिहासाचे दर्शन घडविण्यात येणार आहे. रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यासोबतच आधुनिक महाराष्ट्राची झलक यात असेल, अशी माहिती देसाई यांनी दिली. 
मान्यवरांसह 3क् हजारांहून अधिक लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत तेथे व्यवस्था करण्यात येत आहे. वानखेडे स्टेडियमवर तीन भव्य स्टेज उभारले जाणार आहेत. या स्टेजवर 2क्क् सन्मानित व्यक्तींना सामावून घेणारी आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. मध्यवर्ती व्यासपीठावर 
नरेंद्र मोदी, राज्यपाल सी. विद्यासागर राव असतील. तर दोन्ही बाजूच्या व्यासपीठांवर उद्योगपती, सेलीब्रिटी, आमदार-खासदारांसह पक्षनेत्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
संपूर्ण शपथविधी सोहळा सर्वच उपस्थितांना अनुभवता यावा, यासाठी भव्य एलईडी स्क्रीनचीही व्यवस्था केली जाणार आहे. स्टेडियमबाहेर समुद्रात बोटीवर भव्यदिव्य कमळाची प्रतिकृती उभारली जाणार आहे. या भव्य देखाव्यासाठी 65क् कर्मचारी अहोरात्र राबत आहेत. (प्रतिनिधी)
 
वाहतूककोंडी रोखण्याचे आव्हान
मुंबई : वानखेडे स्टेडियमवरील शपथविधी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोप:यातून मोठय़ा प्रमाणात अति महत्त्वाच्या व्यक्ती आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असून, वानखेडे परिसरातील वाहतूककोंडी रोखण्याचे मोठे आव्हान वाहतूक पोलिसांसमोर असणार आहे. यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी वानखेडे आणि त्या परिसरात पार्किगला बंदी करताना वाहतुकीच्या मार्गात तात्पुरता बदल करण्याचाही निर्णय घेतला आहे. 
 
1प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते सुंदर महल जक्शनदरम्यान वाहनांना नो पोर्किग  डी रोड, 
एफ रोड आणि एम. के. रोड चर्चगेट जंक्शन ते चर्नी रोड जंक्शनर्पयत वाहनांना नो पार्किग
2पाहुण्यांना खासगी बसेस आणि मोठी वाहने 
एम. के. रोड येथे उतरवतील व आयोजकांनी त्यांना नेमून दिलेल्या पार्किगच्या ठिकाणी वाहने पार्क करतील. 
3पेडर रोड आणि एन. एस. रोड मार्गे येणा:या बसेस प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ब्रिजवरून वळवण्यात येऊन पुढे मेट्रोकरिता शामलदास गांधीमार्गे, जे.एस.एस. रोड मेट्रो जंक्शन ते आनंदीलाल पोद्दार मार्ग ते एम. के. रोडमार्गे मार्गस्थ होईल. 
 
4अति अति महत्त्वाच्या व्यक्ती 
या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या 30 मिनिटे अगोदर दक्षिण वाहिनीवरील वाहनांना बंदी असेल. 
5दुपारी 3 ते रात्री 10 या दरम्यान इंडियन र्मचट चेंबर्स रोड हा बॉम्बे हॉकी असोसिएशन ते चर्चगेट रेल्वे स्थानक असा एकदिशा मार्ग राहील. डी रोड येथे फक्त स्थानिक रहिवासी यांना त्यांच्या निवासाचा पुरावा किंवा ओळखपत्र दाखविल्यानंतर येण्या-जाण्यास प्रवेश देण्यात येईल. 
 
विदर्भवासीयांनी रेल्वेने घेतली
मुंबईकडे धाव
मुंबई : भाजपा नेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. विदर्भातील नेता मुख्यमंत्रिपदी म्हणून विराजमान होत असल्याने मोठी उत्सुकता लागलेल्या विदर्भवासीयांनी त्यांच्या शपधविधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी मुंबईकडे धाव घेतली आहे. त्यामुळे विदर्भातून येणा:या अनेक रेल्वे गाडय़ांचे बुकिंग सुरू आहे. विदर्भातील नेता मुख्यमंत्रिपदी विराजमान होत असल्याने मोठी उत्सुकता विदर्भवासीयांमध्ये आहे. 3क् आणि 31 ऑक्टोबर रोजी विदर्भातून मुंबईत येण्यासाठी विदर्भ एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, दुरान्तो एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, कोलकाता हावडा एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर राजधानी एक्स्प्रेसला मोठी मागणी आहे. यातील कोचसुद्धा आरक्षित करण्यात आले आहेत. कोलकाताहून मुंबईत येणा:या हावडा एक्स्प्रेसमधील दोन स्लीपर कोचही आरक्षित करण्यात आले आहेत.
 
लोहपुरुषांसमोर होणार नतमस्तक
राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी शुक्रवारी सकाळी देवेंद्र फडणवीस लोहपुरुष सरदार पटेल यांच्यासमोर नतमस्तक होणार आहेत. या वेळी ‘राष्ट्रीय एकता’ची शपथ घेणार आहेत. वरळी येथील एनएससीआई स्टेडियम येथे आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत.
 
वानखेडे स्टेडियम 
होतेय सज्ज.. 
दिग्दर्शक नितीन 
देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी होणा:या राज्यातील भाजपा सरकारच्या भव्य दिव्य,  शाही शपथविधी  सोहळ्य़ाची जय्यत तयारी सुरू आहे. अनेक अतिमहत्त्वाच्या मान्यवरांसह सुमारे 3क् हजार लोक याप्रसंगी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.   

 

Web Title: A special decoration for the swearing-in ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.