शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधासाठी विशेष मोहीम

By admin | Updated: June 11, 2016 02:45 IST

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आजार नियंत्रणात्मक उपाययोजना राबविल्या जातात.

नवी मुंबई : पावसाळ््याच्या कालावधीत वाढणाऱ्या रोगराईवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आजार नियंत्रणात्मक उपाययोजना राबविल्या जातात. हिवताप, डेंग्यू या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमाणावर घरांतर्गत डास उत्पत्ती शोध मोहीम हाती घेतली असून जून ते सप्टेंबर या कालावधीत जनजागृती मोहीमही राबविली जाणार आहे. हिवताप, डेंग्यू आजाराचा प्रसार रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीपर उपक्र म जून ते सप्टेंबर या कालावधीत हाती घेण्यात येत असून त्यामध्ये हिवताप, डेंग्यू जनजागृतीपर शिबिरे, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सत्र, पन्नासहून अधिक सदनिका असलेल्या मोठ्या सोसायट्यांमध्ये तेथील पदाधिकाऱ्यांचे सहकार्य घेऊन सदनिकाधारकांची जनजागृतीपर बैठक आयोजन त्याचप्रमाणे महिला मंडळे व ज्येष्ठ नागरिक यांच्याकरिता कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे. खासगी, वैद्यकीय व्यावसायिकांसाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. ५ जूनपासून प्रत्येक शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधात्मक जनजागृती करण्यात येत आहे.मलेरिया, डेंग्यूसारख्या कीटकजन्य आजारांबाबत डासअळी व डासांची उत्पत्तीस्थाने यांची प्रात्यक्षिके, प्रदर्शन संच, गटाने व सामूहिक पध्दतीने चर्चा, हस्तपत्रके वितरण, पोस्टर्स - बॅनर्सव्दारे प्रचार करण्यात येत आहे. नागरिकांना घरांतर्गत डास उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी आरोग्य शिक्षण देऊन हिवताप, डेंग्यू व इतर साथीच्या आजारांपासून संरक्षण करण्याबाबत माहिती देण्यात येत आहे.गप्पी मासे हे डासांच्या अळ्या खातात म्हणून नागरिकांना गप्पी माशांची आवश्यकता असल्यास जवळच्या महापालिकेच्या आरोग्य केंद्रामार्फत नागरिक गप्पी मासे प्राप्त करून घेऊ शकतात. घरोघरी जाणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत तसेच महापालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रे व रु ग्णालयांमध्ये सर्व प्रकारच्या तापाच्या रु ग्णांची मोफत रक्त तपासणी केली जाते. नागरिकांनी आपले घर, कार्यालय परिसरात पाणी साचू देवू नये, तसेच हिवताप, डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव दिसल्यास व डासांचा प्रादुर्भाव दिसल्यास नजीकच्या आरोग्य केंद्राशी किंवा नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)शहरातील ३.७५ लाखांहून अधिक घरांमध्ये वरची टाकी, खालची टाकी, लॉफ्ट टँक, ड्रम, टायर्स, कुंड्या अशा संभाव्य डास उत्पत्ती स्थानांची तपासणी करण्यात येऊन आढळलेली डास उत्पत्ती स्थाने नष्ट, उपचारीत करण्यात आलेली आहेत. खासगी व नवी मुंबई महानगरपालिकेची रु ग्णालये, बांधकाम ठिकाणे, गॅरेजेस अशा ठिकाणी डास उत्पत्ती नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात आली असून त्यादृष्टीने प्रतिबंधक आरोग्य शिक्षण देण्यात आलेले आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा तसेच खासगी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये डासनाशक फवारणी करण्यात आलेली आहे.