शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

किटकनाशक फवारणी करणाऱ्या शेतमजूरांच्या आरोग्य  तपासणीसाठी 18 ऑक्टोबर पासून विशेष अभियान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 18:04 IST

जिल्हयातील शेती पिकांवर किटकनाशक फवारणी करणाऱ्या शेतमजुरांसाठी नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन 18 ऑक्टोबर पासून करण्यात आले आहे.

यवतमाळ - जिल्हयातील शेती पिकांवर किटकनाशक फवारणी करणाऱ्या शेतमजुरांसाठी नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन 18 ऑक्टोबर पासून करण्यात आले आहे.  कृषी व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.किटकनाशक फवारणी विषबाधा दुर्घटनेनंतर अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनांचाच एक भाग म्हणून किटकनाशक फवारणी करणाऱ्या शेतमजुरांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हयातील ग्रामीण रुग्णालयात हे  विशेष अभियान राबविण्यात येईल.

किटकनाशक फवारणी करणाऱ्या सर्व शेतमजूरांनी आरोग्य तपासणी संदर्भात जवळच्या ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधून आरोग्य तपासणी करुन घ्यावी. सदर अभियानांतर्गत आरोग्य तपासणी करुन घेणाऱ्या शेतमजूराला आरोग्य तपासणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याचवेळी कृषी विभागामार्फत कीटक नाशकांच्या फवारणीच्या वेळी वापरावयाच्या सुरक्षितता किटचे मोफत वाटप करण्यात येईल. 

पुढील फवारणीसाठी शेतमजुरांना काम देताना त्यांच्याकडे आरोग्य विभागाचे फिटनेस प्रमाणपत्र आणि सुरक्षितता किट असल्याची खात्री शेतकरी बांधवांनी करावी. त्यानंतर त्यांना फवारणीचे काम द्यावे, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे. किटकनाशक फवारणीचे काम करणाऱ्या शेतमजूरांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आणि आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत केले आहे.

संभाजी ब्रिगेड घाटंजी कार्यकर्त्यांना अटकविषबाधेने मरणपावलेल्या शेतक-यांना मुख्यमंत्री कधी भेट देणार यासाठी यवतमाळ जिल्ह्यात 16 तालुक्यात संभाजी ब्रिगेडने "तुम कब आओगे" आंदोलन करत मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला बेश्रमाच्या फुलांचा हार घालुन आक्रोष व्यक्त केला. आतातरी मुख्यमंञी साहेब जागे व्हा व आमच्या आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याला भेट द्या अशी मागणी केली. 

टॅग्स :Farmerशेतकरी