मोबाईलवर बोलणे महागात पडले,७० हजारांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2016 16:19 IST2016-10-16T16:19:09+5:302016-10-16T16:19:09+5:30
तीन चार मिनिटे मोबाईलवर बोलताना किती किंमत चुकवावी लागू शकते? ७० हजार रुपये ! पटण्यासारखे नसले तरी हे खरे आहे. मोबाईलवर बोलताना थोडासा निष्काळजीपणा दाखवल्यामुळे

मोबाईलवर बोलणे महागात पडले,७० हजारांचा फटका
>
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 16 - तीन चार मिनिटे मोबाईलवर बोलताना किती किंमत चुकवावी लागू शकते? ७० हजार रुपये ! पटण्यासारखे नसले तरी हे खरे आहे. मोबाईलवर बोलताना थोडासा निष्काळजीपणा दाखवल्यामुळे एका व्यक्तीला ७० हजाराचा फटका बसला. सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे.
शनिवारी दुपारी ३.३० वाजता सुधाकर लभाजी मते (वय ४७) यांनी सीताबर्डी पोलिसांकडे त्याची तक्रार नोंदविली. त्यानुसार, ते ज्यांच्याकडे काम करतात त्या व्यापा-याची रक्कम मते यांनी शनिवारी दुपारी अॅक्सीस बँकेतून काढली. त्यातील काही रक्कम व्यापा-याच्या घरी पोहोचविली. तर, कार्यालयीन कामासाठी आवश्यक असलेले ६९ हजार रुपये आणि ८०० रुपये किंमतीचे दोन मुद्रांक एका हॅण्डबॅगमध्ये ठेवून ते दुचाकीने सीताबर्डीतून निघाले. तेवढ्यात त्यांचा मोबाईल वाजला. त्यामुळे ते झाशी राणी चौकाजवळ रस्त्याच्या बाजूला उभे राहून फोनवर बोलू लागले. विषय महत्वाचा असल्याने संभाषण लांबले. पैशांची बॅग दुचाकीच्या हॅण्डलला अडकवून होती. मोबाईलवर बोलताना त्यांचे बॅगकडे दुर्लक्ष झाले. ही संधी साधून एका आरोपीने ती बॅग बेमालूमपणे हॅण्डलमधून काढून घेतली अन् पळ काढला. फोन बंद झाल्यानंतर पैश्याची बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. चोरट्याचा शोध घेतला जात आहे.