शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा अध्यक्षांवर विरोधकांचा अविश्वास , सापत्न वागणुकीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 06:25 IST

विरोधी पक्षाच्या सदस्यांना सभागृहात सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप करत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विरोधकांनी सोमवारी अविश्वास प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावावर ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्यासह ३५ आमदारांच्या सह्या आहेत.

मुंबई - विरोधी पक्षाच्या सदस्यांना सभागृहात सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप करत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विरोधकांनी सोमवारी अविश्वास प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावावर ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्यासह ३५ आमदारांच्या सह्या आहेत.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीपासून आपणास बोलू दिले जात नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे. सोमवारी कामकाज सुरू झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपावरून भाजपा सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी दोन्ही सभागृहांतील प्रमुख नेत्यांची संयुक्त समिती नेमण्याची सूचना केली. अजित पवारांनी ती तात्काळ मान्य करत, कामकाज सुरू करण्याची मागणी केली. मात्र, सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी गोंधळ घातल्यामुळे अध्यक्षांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.तहकुबीमुळे संतापलेल्या विरोधकांची विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्या दालनात बैठक झाली. त्यात अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय झाला. तसा प्रस्ताव सादर करण्यात आला. विधिमंडळाचे सभागृह सार्वभौम असून विधानसभा अध्यक्षांनी सर्व सदस्यांना मते मांडण्याची संधी द्यायला हवी. परंतु बागडे यांची वर्तणूक सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षासारखी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांची वागणूक हुकुमशाही प्रवृत्तीची आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला. सत्तेतील शिवसेना कोणताही मुद्दा शेवटपर्यंत नेत नाही. ते वेळोवेळी भूमिका बदलत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. नाणार प्रकल्पाबाबत सभागृहात चर्चा झाली नव्हती. पण त्यावर त्याच दिवशी उद्योगमंत्र्यांनी जे उत्तर दिले होते ते त्यांच्या पक्षाच्या अंगलट आले. म्हणून आज सुभाष देसाई यांनी त्या विषयावर निवेदन केले. पण मुख्यमंत्री फडणवीस शोकप्रस्ताव मांडत असताना तो बाजूला सारुन उद्योगमंत्र्यांनी निवेदन केले.आता पुढे काय?अध्यक्षांवर अविश्वास ठराव मांडला गेला, तर त्याचा निर्णय होईपर्यंत अध्यक्षांनी सभागृहात येऊ नये आणि त्या काळात उपाध्यक्षांनी कामकाज पाहावे, असे संकेत आहेत. मात्र, या सरकारने शिवसेनेला उपाध्यक्षाचे पद मिळेल, म्हणून तेही भरलेले नाही. त्यामुळे आता तालिका अध्यक्षांनी या काळात काम पाहावे आणि संकेतांचे पालन करावे, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली.महसूलमंत्र्यांनी काढली औकात!भाजपा आणि संघ परिवाराच्या विचारधारेवर झालेल्या टीकेमुळे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सोमवारी अक्षरश: पारा चढला. प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्यावरून आपण भाजपाच्या विचारधारेवरच बोट ठेवले. त्यामुळे चिडलेल्या चंद्रकांत पाटील यांनी अंगावर धावून जात, ‘तुझी औकात काय? तुला बघून घेईन,’ अशी धमकी दिल्याचा आरोप शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रvidhan sabhaविधानसभाHaribhau Bagadeहरिभाऊ बागडे