विधानसभा अध्यक्षांनी कृपाशंकर सिंह यांच्या चौकशीची परवानगी नाकारली

By Admin | Updated: July 13, 2014 01:57 IST2014-07-13T01:57:52+5:302014-07-13T01:57:52+5:30

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आ़ कृपाशंकर सिंह यांच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाच्या चौकशीची परवानगी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी नाकारली़

The Speaker of the Assembly rejected the permission for the inquiry of Kripashankar Singh | विधानसभा अध्यक्षांनी कृपाशंकर सिंह यांच्या चौकशीची परवानगी नाकारली

विधानसभा अध्यक्षांनी कृपाशंकर सिंह यांच्या चौकशीची परवानगी नाकारली

मुंबई : मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आ़ कृपाशंकर सिंह यांच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाच्या चौकशीची परवानगी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी नाकारली़ 
उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याने कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिक दाखल झाली होती़ यानंतर सिंह आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करण्यात आला़ सीबीआय, आयकर विभाग आणि मुंबई पोलिसांनी आपल्या तपासाचा अहवाल न्यायालयाकडे सादर केला होता़ त्यानंतर पुढील कारवाई परवानगीची मागणी पोलिसांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली़ मात्र, ती   विधानसभा अध्यक्षांनी नाकारली़ यावर विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी टीका केली़ आघाडी सरकार कृपाशंकर सिंह यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला़ तर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र या निर्णयाचे समर्थन केल़े (प्रतिनिधी)

 

Web Title: The Speaker of the Assembly rejected the permission for the inquiry of Kripashankar Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.