‘बोल मेरे भाई, हल्लाबोल..!’

By Admin | Updated: November 15, 2014 01:38 IST2014-11-15T01:38:35+5:302014-11-15T01:38:35+5:30

‘बोल मेरे भाई, हल्लाबोल..!’ ‘आमच्या मागण्या पूर्ण करा, नाही तर खुच्र्या खाली करा..!’ अशा घोषणांनी दणाणण्यासाठी आझाद मैदान पुन्हा एकदा सज्ज झाले आहे.

'Speak my brother, attack him ..!' | ‘बोल मेरे भाई, हल्लाबोल..!’

‘बोल मेरे भाई, हल्लाबोल..!’

चेतन ननावरे - मुंबई 
‘बोल मेरे भाई, हल्लाबोल..!’ ‘आमच्या मागण्या पूर्ण करा, नाही तर खुच्र्या खाली करा..!’ अशा घोषणांनी दणाणण्यासाठी आझाद मैदान पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. लोकसभा निवडणुका आणि त्यापाठोपाठ लागलेल्या विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे गेल्या काही महिन्यांपासून मैदान थंडावले होते. मात्र नवनिर्वाचित सरकारच्या कानावर मागण्या पोहोचवण्यासाठी कामगार संघटनांच्या तोफा पुन्हा एकदा सज्ज झाल्या आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस संघटित आघाडी सरकारचा पायउतार झाल्याने आता भारतीय जनता पक्षप्रणीत नवनिर्वाचित सरकार सत्तेवर आलेले आहे. त्यामुळे याआधी विरोधी बाकावर असताना भाजपाने दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी काही संघटना मोर्चा काढणार आहेत. तर आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी काही संघटना नव्या सरकारवर दबाव तंत्रचा वापर करण्यासाठी आक्रमक पवित्र घेताना दिसतील. त्यात प्रामुख्याने घरेलू कामगार, नाका कामगार, बांधकाम कामगार आणि कंत्रटी कामगार अशा असंघटित कामगारांचा समावेश आहे. शिवाय गिरणी कामगार, महापालिका आणि राज्य शासन कर्मचारी व अधिकारी या संघटित कामगार संघटनाही दिसतील. आझाद मैदानापुढे मोर्चे नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सक्त मनाई केली आहे. त्यामुळे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आंदोलक भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीबाग येथून मोर्चे घेऊन मैदानावर धडकतात. त्याआधी मोर्चाचे नेतृत्व करणा:या व्यक्तीकडून बंधपत्र भरून घेतले जाते. जेणोकरून आंदोलकांनी कोणतेही गैरवर्तन केल्यास बंधपत्र भरणा:या व्यक्तीवर कारवाई करण्यात येते. याउलट परवानगी नसताना मोर्चा काढणा:यांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातात.
 
ऑक्टोबर 2क्14 र्पयत 2क्क् हून कमी आंदोलने झाल्याचा दावा आझाद मैदान पोलिसांनी केला आहे. या वर्षी पार पडलेल्या लोकसभा व निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे यंदा आंदोलनांची संख्या घटल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
 
मराठा आरक्षण, एलबीटी, दलित हत्याकांडाच्या वाढत्या घटना, इंदू मिलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारणो या ज्वलंत मुद्दय़ांवर तोडगा काढण्यासाठी त्या-त्या समाजाच्या प्रमुख संघटना आझाद मैदानावर धडकण्याची शक्यता आहे.
 
एमएमआरडीएची दोन घरे एकत्रित करून गिरणी कामगारांना येत्या सहा महिन्यांत मिळण्याची अपेक्षा आहे. शिवाय मालकांच्या ताब्यातील गिरण्या ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम सुरू करण्याची मागणी करण्यासाठी लवकरच आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येईल. त्यासाठी मंगळवारी गिरणी कामगारांच्या पाच प्रमुख संघटनांची बैठक आयोजित केली आहे. मोर्चाची तारीखही त्याच बैठकीत निश्चित केली जाईल.
- दत्ता इस्वलकर, गिरणी कामगार नेते
 
देशव्यापी बंद केल्यानंतर जॉइंट ट्रेड युनियनच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भायखळा येथील राणीबागहून धडक मोर्चा आझाद मैदानावर काढण्यात येणार आहे. त्यात असंघटित कामगारांना किमान वेतन मिळण्याचा कायदा करण्याची मागणी करण्यासाठी सीटू, इंटक अशा विविध केंद्रीय कामगार संघटना एकत्र येणार आहेत.
- शुभा शमीम, सामाजिक कार्यकत्र्या
 
पाथर्डी हत्याकांडापाठोपाठ राज्यात विविध दलित वस्त्यांवर आणि कुटुंबांवर जातीय हल्ले झाले आहेत. त्यामुळे शासनाला जाग आणण्यासाठी 28 नोव्हेंबरला आझाद मैदानावर धडक मोर्चा काढणार आहे.
- ज्योती बडेकर, सामाजिक कार्यकत्र्या
 

 

Web Title: 'Speak my brother, attack him ..!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.