शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

आजपासून अधिवेशनाला सुरुवात ; अधिवेशन हिवाळी की वादळी ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 07:51 IST

आरक्षणापासून संपापर्यंत ते पेपरफुटी अशा अनेक मुद्यांवर बॅकफूटवर असलेल्या महाविकास आघाडीसाठी आजपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कसोटीचे ठरणार आहे.

अल्पेश करकरेराज्यात कोरोना काळात झालेले भ्रष्टाचार, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पाठोपाठ म्हाडाच्या परीक्षेत झालेला घोळ, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला एसटी कामगारांचा संप, इतर मागासवर्गाच्या (ओबीसी) आरक्षणाविना होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, कुलगुरू निवडीवरून राज्यपालांच्या अधिकारांना लावलेली कात्री, शस्त्रक्रियेमुळे मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागलेली सक्तीची विश्रांती, परिणामी सुस्तावलेले प्रशासन आदी मुद्यांवर बॅकफूटवर असलेल्या महाविकास आघाडीसाठी आजपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कसोटीचे ठरणार आहे.

विरोधी पक्ष भाजपने अधिवेशनात आक्रमक होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक ज्वलंत प्रश्नांवर भाजप विरुद्ध आघाडी सरकार असा सामना सभागृहात रंगण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे हे अधिवेशन हिवाळी की वादळी ठरतंय हे पाहणे पुढील दिवसात महत्त्वाचे ठरणार आहे.

हे अधिवेशन आघाडीसाठी आव्हानात्मककोरोना प्रादुर्भावाच्या भीतीने सलग दुसर्‍या वर्षी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होत आहे. २२ डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून सुरू होणार्‍या पाच दिवसांच्या अधिवेशनात आघाडी सरकारला घेरण्यासाठी भाजपकडे अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशन तापणार असून भाजपच्या हल्ल्याला तोंड देणे आघाडीसाठी आव्हानात्मक आहे. अधिवेशनात ओबीसी आरक्षण, शासकीय भरतीच्या परीक्षा घेण्यात आलेले अपयश, एसटीचा चिघळलेला संप, महापालिका व नेतेमंडळींवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप आदी मुद्यांवरून अधिवेशन वादळी ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यात विरोधक आक्रमक होणार त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी देखील तयारी केली आहे.

कोणत्या प्रश्नावर वादळी चर्चा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी समाजाला आरक्षण देणारा राज्य सरकारचा अध्यादेश सुप्रीम कोर्टाने स्थगित केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायतींच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होत आहेत. ओबीसी आरक्षणासारख्या राजकीयदृट्या संवेदनशील विषयात सरकारला आलेले अपयश लक्षात घेऊन भाजप अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सरकारवर तुटून पडण्याची शक्यता आहे. ओबीसी प्रमाणे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर, तसेच पेपर फुटी प्रकरणामुळे व होणाऱ्या आरोपांमुळे  अधिवेशनात पेपर फुटीचे प्रकरण सरकारसाठी चांगलेच अडचणीचे ठरणार असून या मुद्यावर विरोधी पक्षाकडून आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ शकते.

याशिवाय परिवहन मंत्री अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या कथित आरोपावरून भाजप सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. कोरोना काळातील भ्रष्टाचार,सरकारच्या योजना यावर देखील विरोधक प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याची शक्यता, एसटी  कर्मचार्‍यांचा संप हाताळण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत तसेच आदी मुद्यांवर विरोधी पक्ष आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत पाहिल्या दिवसापासून दिसणार आहे.

विधानसभेला नवा अध्यक्ष मिळणारजवळपास १० महिन्यांपासून रिक्त असलेले विधानसभा अध्यक्षपदासाठी यावेली नवी नेमणूक होण्याचीही शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या मतदान पद्धतीने होणार आहे. त्यासाठी विधानसभा नियम समितीने अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत बदल केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवड होणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच विरोधी पक्ष भाजप देखील उमेदवार उभा करणारा असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितले आहे. त्यामुळे या अधिवेशनात विधानसभेला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. या अध्यक्ष निवड प्रक्रियेत ही वाद विवाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे.आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात कामकाज

  • बुधवार, २२ डिसेंबर २०२१ – अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे, सन २०२१-२२ च्या पुरवणी मागण्या सादर करणे, शासकीय कामकाज, शोक प्रस्ताव
  • गुरुवार २३ डिसेंबर २०२१ – शासकीय कामकाज, विरोधी पक्षाचा प्रस्ताव
  • शुक्रवार २४ डिसेंबर २०२१ – सन २०२१-२२ च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान (पहिला व शेवटचा दिवस), शासकीय कामकाज, अशासकीय कामकाज विधेयके
  • शनिवार २५ डिसेंबर २०२१ – सुट्टी
  • रविवार २६ डिसेंबर – सुट्टी
  • सोमवार – २७ डिसेंबर २०२१ – पुरवणी विनियोजन विधेयक, शासकीय कामकाज, अंतिम आठवडा प्रस्ताव
  • मंगळवार – २८ डिसेंबर २०२१ – शासकीय कामकाज, सत्तारुढ पक्षाचा प्रस्ताव
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रvidhan sabhaविधानसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा