सपाची कार्यकारिणी बरखास्त
By Admin | Updated: March 20, 2017 03:49 IST2017-03-20T03:49:08+5:302017-03-20T03:49:08+5:30
मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावे लागलेल्या समाजवादी पार्टीची

सपाची कार्यकारिणी बरखास्त
मुंबई : मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावे लागलेल्या समाजवादी पार्टीची विद्यमान प्रदेश कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.
पक्षाच्या भवितव्याचा विचार करून नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, असे सपाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष व आमदार अबू आझमी यांनी सांगितले. मुंबईतील अपयशाबरोबरच उत्तर प्रदेश निवडणुकीत सत्ताधारी सपाला सपाटून मार खावा लागल्याने
पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले आहे.
त्यामुळे त्यांच्यात नव्याने उत्साह निर्माण करण्यासाठी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष आझमी यांच्यासह परवेज सिद्दिकी, अब्दुल रौफ, अफजल फारुख, आयुब खान उपस्थित होते. (प्रतिनिधी)