शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:50 IST

Abu Azmi on Hindi Language Controversy: राज्यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी शिकवण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयाने वादंग उठला आहे. विद्यार्थ्यांवर ...

Abu Azmi on Hindi Language Controversy: राज्यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी शिकवण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयाने वादंग उठला आहे. विद्यार्थ्यांवर लहानपणापासूनच हिंदी भाषेची सक्ती केली जात असल्याचे विरोधकांनी म्हटलं आहे. एकीकडे मराठी साहित्यिकांसह मनसे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा हिंदी भाषा शिकवण्याला विरोध सुरु आहे. दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबु आझमी यांनी हिंदी भाषेला राष्ट्रभाषा घोषित केले पाहिजे असं म्हटलं. तसेच हिंदी भाषा कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत बोलली गेली पाहिजे, असंही अबू आझमी म्हणाले. त्यांच्या या विधानाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक आराखड्यातील तरतुदींनुसार महायुती सरकारने मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी तिसरी भाषा म्हणून शिकवण्याचा शासन निर्णय जाहीर केला. त्यानुसार पहिलीच्या वर्गापासून हिंदीची सक्ती रद्द करण्यात आली नसली तरी पाचवीपर्यंत हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकणं बंधनकारक असणार आहे. पाचवी किंवा सहावीनंतर येणारा हिंदी भाषेचा विषय पहिलीपासूच शिकवण्यात येणार असल्याने विरोधकांनी यावर संताप व्यक्त केला. मात्र अबू आझमी यांनी हिंदी भाषेवरुन काही लोक राजकारण करत असल्याचे म्हटलं.

"राज्य सरकारने तीन भाषांच्या संदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. मराठी ही इथली पहिली भाषा आहे. दुसरी भाषा इंग्रजी आहे. आपली लोकं गुलाम आहेत म्हणून इंग्रजीच्या मागे पळत आहेत आणि देशभरात तिसरी भाषा हिंदी आहे. संसदेत एक समिती आहे जी देशभर हिंदीचा प्रचार करण्यासाठी जाते आणि केंद्र सरकारचे सर्व काम हिंदीमध्येच होते. काही लोकांना फक्त राजकारण करायचं आहे. हिंदी भाषा संपूर्ण देशात अनिवार्य आहेच. हिंदीला १०० टक्के राष्ट्रभाषा म्हणून घोषित केले पाहिजे. एकच भाषा जी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत बोलली पाहिजे. मी आसामला गेलो तर आसामी शिकायचे का? एकच भाषा असली पाहिजे जी संपूर्ण देशात वापरली गेली पाहिजे," असं अबू आझमी म्हणाले.

दरम्यान, त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सोमवारी : त्रिभाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. "मराठी भाषेचे अभ्यासक, साहित्यिक, राजकीय नेते यासह सर्व संबंधितांसमोर याचे सादरीकरण आणि सल्लामसलतीची प्रक्रिया राबविण्यात यावी, असे या बैठकीत ठरले. ही सल्लामसलतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच अंतिम निर्णय घेण्यात येईल," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीmarathiमराठीhindiहिंदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरे