शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सपाचा महाराष्ट्रातील 10-12 जागांवर डोळा; जागा वाटपाबाबत अखिलेश यादव स्पष्ट बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 15:34 IST

Akhilesh Yadav: सपा अध्यक्ष अखिलेश यादव उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून, मविआच्या नेत्यांसोबत जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहेत.

Akhilesh Yadav on Maharashtra Assembly Election 2024 : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत समाजवादी पक्षाचे(सपा) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी मोठे विधान केले आहे. सपा अध्यक्ष म्हणाले की, महाराष्ट्रात इंडिया आघाडीने एकत्र निवडणुका लढवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्हाला जास्त जागा मिळण्याची अपेक्षा आहे. मी शुक्रवारी महाराष्ट्रात जातोय, तिथे याबाबत चर्चा होईल. 

अखिलेश यादव काय म्हणाले?सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज लखनौमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना इंडिया आघाडी मजबुतीने एकत्र काम करत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले, 'मी उद्या महाराष्ट्रात जाणार आहे. इंडिया आघाडीसोबत युती करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आमचे राज्यात दोन आमदार आहेत. आम्हाला आशा आहे की, यावेळी जास्त जागा मिळतील. आम्ही पूर्ण ताकदीने इंडिया आघाडीसोबत उभे राहू.

सपाचा 10-12 जागांवर डोळाअखिलेश यादव दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान त्यांचे मालेगाव आणि धुळे येथे कार्यक्रम होतील. दरम्यान, सपा आता यूपीबाहेरही पक्षाचा विस्तार करत आहे. सपाचा महाराष्ट्रातील 10-12 जागांवर डोळा आहे. यामध्ये त्या जागांचा समावेश आहे, जिथे मुस्लिम आणि यूपीमधून येणारे लोक जास्त प्रमाणात राहतात. दरम्यान, महाराष्ट्र विकास आघाडीत सपाला 3-4 जागा मिळू शकतात, अशी चर्चा आहे.

सपाचे राज्यात दोन आमदारसध्या महाराष्ट्रात सपाचे दोन आमदार आहेत. त्यापैकी अबू आझमी हे शिवाजी नगरचे तर रईस शेख हे भिवंडीचे आमदार आहेत. अलीकडेच अखिलेश यादव यांनी लखनौमध्ये महाराष्ट्र युनिटच्या नेत्यांची बैठकही घेतली होती. ज्यामध्ये निवडणुकीची रणनीती तयार करण्यात आली आहे. सपा इंडिया आघाडीचा भाग बनल्यास अखिलेश यादव महाराष्ट्रातही प्रचार करताना दिसू शकतात.

अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा

महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपल्या आघाडीत समाजवादी पार्टीचा अपमान करू नये. आत्तापर्यंत महाविकास आघाडीच्या अनेक बैठका झाल्या. मात्र समाजवादी पार्टीला फक्त एकाच बैठकीत बोलावण्यात आले आणि केवळ 5 मिनिटे चर्चा झाली. समाजवादी पार्टी हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, त्याला हलक्यात घेऊ नये.  जर समाजवादी पार्टीला विश्वासात घेतले नाही आणि योग्य वाटा दिला नाही तर समाजवादी पार्टीला इतर कोणत्याही आघाडीसोबत म्हणजेच तिसरी आघाडी किंवा प्रकाश आंबेडकर किंवा महाराष्ट्रात अनेक जागांवर स्वबळावर निवडणूक लढवेल. त्यानंतर जर मुस्लिम मतांची विभागणी झाली तर त्याला समाजवादी पार्टी नव्हे, तर महाविकास आघाडी जबाबदार असेल, असा इशारा अबू आझमी यांनी दिला आहे.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी