शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
4
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
5
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
7
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
8
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
9
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
10
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
11
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
12
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
13
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
14
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
15
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
16
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
17
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
18
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
19
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
20
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?

पेरणी एका पिकाची विमा दुस-या पिकांचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2016 02:55 IST

प्रत्यक्ष क्षेत्रापेक्षा दीड पट क्षेत्रावरील पीक विमा.

विवेक चांदूरकरबुलडाणा, दि. २0- पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकर्‍यांनी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्रापेक्षा दीड पट जास्त क्षेत्रावरील विमा काढला आहे. जिल्हय़ात कपाशीची १ लाख ४८ हजार ७३ हेक्टरवर पेरणी करण्यात आली असून, २ लाख २१ हजार हेक्टरवरील कपाशीचा विमा काढण्यात आला आहे. शासनाच्यावतीने पिकांचा विमा काढण्याकरिता शेतकर्‍यांना अनेकदा प्रोत्साहित करण्यात येत असले तरी जिल्हय़ात आतापर्यंत केवळ ६0 टक्के क्षेत्रावरील पिकांचाच विमा काढण्यात आला आहे. जिल्हय़ात ७ लाख ३३ हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे; मात्र आतापर्यंत केवळ ४ लाख ४९ हजार ४४५ हेक्टरवरील िपकांचाच विमा काढण्यात आला आहे. तर २ लाख ८४ हजार ४३0 हेक्टरवरील पिकांचा विमा अद्यापही काढण्यात आला नाही. बँकांच्या वतीने शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटप करताना पीकनिहाय विविध दर ठरविण्यात आले आहे. कपाशीकरिता १७ हजार ६00 रुपये प्रति एकर पीक कर्ज देण्यात येते. तसेच सोयाबीनला १४ हजार ६00 रुपये, ज्वारीसाठी ८ हजार रुपये प्रति एकर कर्ज दिल्या जाते. त्यामुळे शेतकरी जास्त पीक कर्ज घेण्याकरिता कपाशीचे पिकाची पेरणी करणार असल्याचे दाखवितात. कपाशी हे वर्षभराचे पीक आहे. तसेच कपाशीचे उत्पन्नही गत काही वर्षांपासून कमी होते. त्यामुळे शेतकरी कपाशीची पेरणी न करता सोयाबीन, मूग उडिदाची पेरणी करण्याला प्राधान्य देतात. कर्ज घेताना मात्र जास्त कर्ज मिळावे याकरिता कपाशीचे पीक दाखवितात. त्यामुळे प्र त्यक्षात पेरणी केलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचा विमा काढण्यात येतो. कपाशीचा विमा पेरणीपेक्षा जास्त काढण्यात आला तर सोयाबीनची पेरणी ४११९७८ हेक्टरवर करण्यात आली असून, विमा केवळ २१५२0४ हेक्टरवरील िपकांचा काढण्यात आला आहे. तुरीची पेरणी ८४९८0 हेक्टरवर करण्यात आली असून, विमा १४६३२ हे क्टरवरील पिकांचा काढण्यात आला आहे. मुगाची पेरणी २५६१७ हेक्टरवर तर विमा ६६८५ हेक्टरवरील िपकांचा काढण्यात आला आहे. उडिदाची पेरणी २६८१३ हेक्टरवर तर पेरणी ७0२२ हेक्टरवरील पिकांची करण्यात आली आहे. २ लाख हेक्टरवरील सोयाबीनचा विमाच नाही जिल्हय़ात ३ लाख ८८ हजार ८५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. तर केवळ १ लाख ९९ हजार ४७५ हेक्टरवरील सोयाबीनचाच पीक विमा काढण्यात आला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांनी पिकांचा विमा काढण्याकडे पाठ फिरविली आहे. तसेच सोयाबीनची पेरणी केलेल्या काही शेतकर्‍यांनी कपाशीची पेरणी करणार असल्याचे दाखवून कर्ज घेतले आहे. चुकीच्या विम्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान पेरणी केलेल्या पिकाऐवजी न केलेल्या पिकांचा विमा काढल्यामुळे शेतकर्‍यांना नुकसान सहन करावे लागते. ग तवर्षी दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळाली. तसेच पीक विमाही मिळाला; मात्र कपाशी उत्पादक शेतकर्‍यांना नुकसानभरपाई व पीक विमा मिळाला नाही. त्यामुळे सोयाबीनची पेरणी केल्यावरही क पाशीचा विमा काढणार्‍या शेतकर्‍यांना नुकसान सहन करावे लागले.  आतापर्यंत जिल्ह्यात शेतकर्‍यांनी ६0 टक्के क्षेत्रावरील पिकांचा विमा काढला आहे. तर चाळीस टक्के क्षेत्रावरील पिकांचा विमा काढण्यात आला नाही. जेवढय़ा क्षेत्रावर कपाशीची पेरणी करण्यात आली त्यापेक्षा जास्त क्षेत्राचा विमा काढण्यात आला आहे. - सुभाष बोंदाडे जिल्हा विकास प्रबंधक,नाबार्ड, बुलडाणा