मोदींच्या पाठोपाठ सोनियाजी येणार ?
By Admin | Updated: August 17, 2014 00:54 IST2014-08-17T00:54:06+5:302014-08-17T00:54:06+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या देखील नागपूर दौऱ्यावर येत असल्याची माहिती आहे. काँग्रेसतर्फे औरंगाबाद येथून काढण्यात येत असलेल्या राजीव गांधी चैतन्य

मोदींच्या पाठोपाठ सोनियाजी येणार ?
राजीव गांधी चैतन्य यात्रेचा समारोप
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या देखील नागपूर दौऱ्यावर येत असल्याची माहिती आहे. काँग्रेसतर्फे औरंगाबाद येथून काढण्यात येत असलेल्या राजीव गांधी चैतन्य यात्रेचा समारोप ३१ आॅगस्ट रोजी नागपुरात सोनिया गांधी यांच्या हस्ते करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. तसे निमंत्रण सोनियाजींना देण्यात असून त्यांनी होकार दिला असल्याची माहिती आहे.
याबाबत काँग्रेस नेत्यांकडे अधिकृत माहिती नाही. काँग्रेसचे प्रदेश सचिव जयप्रकाश गुप्ता यांना विचारणा केली असता ते म्हणाले, सोनियाजी येणार असल्याचे ऐकिवात आहे. मात्र, तसा कुठलाही अधिकृत निरोप प्रदेश काँग्रेसकडून आलेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या शुभारंभासाठी व नंतर चिखली मैदानावर झालेल्या प्रचारसभेला अलोट गर्दी जमली होती.(प्रतिनिधी)