शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
3
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
4
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
5
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
6
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
7
पुतीन परतले, पुढे...?
8
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
9
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
10
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
11
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
12
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
13
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
14
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
15
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
16
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
18
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
19
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
20
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: बापू कुटीत राहुल, सोनिया गांधींनी स्वत:च धुतलं स्वत:चं ताट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 15:33 IST

महात्मा गांधींची स्वावलंबनाची शिकवण काँग्रेस नेत्यांकडून आचरणात

वर्धा: महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वर्ध्यात आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सेवाग्राम आश्रमात दुपारचं भोजन घेतलं. यानंतर त्यांनी स्वत:च ताट स्वत:चं धुतलं. यावेळी उपस्थित असलेल्या काँग्रेस नेत्यांनीदेखील स्वत:ची ताटं धुतली. महात्मा गांधी यांनी स्वावलंबनाची शिकवण दिली होती. ती आज काँग्रेस अध्यक्षांसह पक्षाच्या सर्वच नेत्यांनी आचरणात आणल्याचं पाहायला मिळालं. सेवाग्राम आश्रमातील भोजनानंतर राहुल गांधींनी काही स्थानिकांशी संवाद साधला. यानंतर राहुल गांधी एका जनसभेला संबोधित करणार असल्याची माहिती पक्षाच्या नेत्यांनी दिली. थोड्याच वेळात काँग्रेसच्या कार्यकारणीची बैठक होणार आहे. महात्मा गांधींची कर्मभूमी असलेल्या सेवाग्राममध्ये काँग्रेस पक्षाची बैठक होत असल्यानं ती अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण असेल. विशेष म्हणजे तब्बल 70 वर्षांनंतर सेवाग्राम आश्रमात काँग्रेसची बैठक होत आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला राहुल गांधींसह यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, गुलाम नबी आजाद, अशोक गहलोत, रणदीप सुरजेवाला, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित असतील. या बैठकीत वर्तमान राजकारण आणि समाजकारणावर चर्चा होईल. या बैठकीवरुन गेले काही दिवस उलटसुलट चर्चा होती. सेवाग्राम समितीनं काँग्रेसला परवानगी नाकारल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र आज दिवसभर सेवाग्राम आश्रमात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMahatma Gandhiमहात्मा गांधीSonia Gandhiसोनिया गांधी