सोनिया व राहुल गांधी यांची ११ एप्रिल रोजी नागपूरात सभा

By Admin | Updated: April 1, 2016 16:57 IST2016-04-01T16:57:00+5:302016-04-01T16:57:00+5:30

अ.भा. काँग्रेस समितीतर्फे ११ एप्रिल रोजी नागपुरात डॉ.बाबासाहेब आंबेfडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाचा समारोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Sonia Gandhi and Rahul Gandhi meet on 11th April at Nagpur | सोनिया व राहुल गांधी यांची ११ एप्रिल रोजी नागपूरात सभा

सोनिया व राहुल गांधी यांची ११ एप्रिल रोजी नागपूरात सभा

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १ - अ.भा. काँग्रेस समितीतर्फे ११ एप्रिल रोजी नागपुरात डॉ.बाबासाहेब आंबेfडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाचा समारोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी येणार आहेत. काँग्रेस पदाधिका-यांनी निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार दुपारी ३ वाजता विमानाने सोनिया व राहुल गांधी यांचे नागपुरात आगमन होईल. 
 
दुपारी ४ वाजता ते दीक्षाभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन करतील.
त्यानंतर सायंकाळी ५ वाजता कस्तुरचंद पार्क येथे आयोजित जाहीर सभेला मार्गदर्शन करतील. नागपुरात उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे हा कार्यक्रम तासभर पुढे ढकलण्याचाही विचार सुरू आहे. 
 
सभेच्या तयासाठी आज, शुक्रवारी नागपुरात अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस द्विग्वीजय सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मॅराथॉन बैठका घेतल्या. सभेला लाखावर गर्दी होईल, असा दावा प्रदेश काँग्रेसने केला आहे.

Web Title: Sonia Gandhi and Rahul Gandhi meet on 11th April at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.