गीत-संगीतकारांनाही श्रेय मिळावे
By Admin | Updated: July 27, 2014 00:38 IST2014-07-27T00:38:07+5:302014-07-27T00:38:07+5:30
गाणो हिट झाले की बहुधा जो गायक आहे, त्याला त्याचे श्रेय जाते.

गीत-संगीतकारांनाही श्रेय मिळावे
पुणो : गाणो हिट झाले की बहुधा जो गायक आहे, त्याला त्याचे श्रेय जाते. पण, खरे तर गाणो हे टीमवर्क आहे. गीतकार, संगीतकार, गायक, वादक या सगळ्यांनाच त्याचे श्रेय मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी व्यक्त केली.
थर्ड बेल एंटरटेनमेंटतर्फे दिल्या जाणा:या कलातीर्थ पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रशांत बडवे, स्वप्निल रास्ते, पुष्कर देशपांडे उपस्थित होते.
या वेळी माऊली टाकळकर (टाळ), रमाकांत परांजपे, विवेक परांजपे, राजीव परांजपे (सिंथसायजर), राजू जवळकर (तबला), सचिन जांभेकर (हार्मोनियम), अमर ओक (बासरी), केदार मुळे (ढोलकी), राजा साळुंके (तालवादक), रितेश ओव्हाळ (गिटार), अभय इंगळे (:िहदम मशिन) या वादकांचा सत्कार करण्यात आला. तसेच,रंगभूषाकार गणोश जाधव आणि शेफ विष्णू मनोहर यांचाही गौरव करण्यात आला.
पत्की म्हणाले, ‘‘कुठले गाणो चांगले की वाईट, हे प्रेक्षक दोन मिनिटांत ठरवून मोकळे होतात. पण, खरे तर प्रत्येक गाण्यामागे ब:याच जणांची मोठी मेहनत असते. आज येथे इतक्या वादकांचा एकत्रित सत्कार होतो आहे ही चांगली गोष्ट आहे.’’ प्रत्येक गाण्याची कुंडली निराळी असते असे सांगत त्यानी ‘राधा ही बावरी’चा किस्सा सांगितला.
स्वप्निल रास्ते यांनी प्रास्ताविक केले. मोनिका भट यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)