कोणी कोणाला बुडवलं यावरुन काँग्रेस - राष्ट्रवादीत जुगलबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2016 11:36 IST2016-09-17T11:32:15+5:302016-09-17T11:36:01+5:30

एकेकाळी हातात हात घालून सत्ता उपभोगणारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता सत्ता कोणामुळे गेली यावरुन भांडताना दिसत आहे

Someone who has dipped the Congress - Jugalbandi in the NCP | कोणी कोणाला बुडवलं यावरुन काँग्रेस - राष्ट्रवादीत जुगलबंदी

कोणी कोणाला बुडवलं यावरुन काँग्रेस - राष्ट्रवादीत जुगलबंदी

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - एकेकाळी हातात हात घालून सत्ता उपभोगणारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता सत्ता कोणामुळे गेली यावरुन भांडताना दिसत आहे. एकीकडे राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल काँग्रेसने बुडवल्याचा आरोप करत असताना पृथ्वीराज चव्हाण मात्र राष्ट्रवादीने बुडवल्याचं सांगत आहेत. त्यामुळे कोणी कोणाला बुडवलं यावरुन जुन्या मित्रपक्षांमध्ये भांडण होताना दिसत आहे. 
 
काँग्रेसमुळेच राष्ट्रवादी बुडाली आणि पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीच्या मागे चौकशी लावली अशी टीका प्रफुल्ल पटेल यांनी केली होती. याला उत्तर देत पृथ्वीराज चव्हाण यांनी भ्रष्ट नेत्यांमुळेच राष्ट्रवादी बुडाल्याची टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांमुळे राष्ट्रावादी बुडाली काँग्रेसमुळे नाही असं पृथ्वीराज चव्हाण बोलले आहेत. एकमेकांवर सुरु असलेली ही कुरघोडी आता पुढील किती दिवस चालू राहणार आहे हे पाहावं लागेल.
 

Web Title: Someone who has dipped the Congress - Jugalbandi in the NCP