कसा-याजवळ 600 फूट खोल दरीत कोसळली कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 20:15 IST2017-07-24T20:15:31+5:302017-07-24T20:15:31+5:30
कसा-याजवळच्या उंटदरी घाटात सोमवारी संध्याकाळी एक वॅगनार कार 600 फूट खोल दरीत कोसळली.

कसा-याजवळ 600 फूट खोल दरीत कोसळली कार
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 24 - कसा-याजवळच्या उंटदरी घाटात सोमवारी संध्याकाळी एक वॅगनार कार 600 फूट खोल दरीत कोसळली. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून, आतापर्यंत चार जणांना बाहेर काढण्यात यश आल आहे. एक लहान मुलगी गाडीत अडकली असून तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
गाडीतून बाहेर काढलेल्या चौघांना नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्रीची वेळ असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. जिथे ही दुर्घटना घडली त्या उंटदरी घाटात दाट धुके असते. पावसाळयात इथे धुक्यांचा आनंद घेण्यासाठी मोठया प्रमाणावर पर्यटक गाडी घेऊन येत असतात.