शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

काही वक्तव्ये भुजबळांकडून आली काही माझ्याकडून; शंभुराज देसाईंनी सांगितले कॅबिनेटमध्ये काय घडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 14:07 IST

मुख्यमंत्र्यांनी शंभुराज देसाई आणि छगन भुजबळ यांच्यातील वादावर कालच्या बैठकीत कानपिचक्या दिल्याची माहिती समोर आली आहे. राऊतांनी गँगवॉरसारख्या परिस्थितीचे आरोप केले आहेत.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काल दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात, ते जरी सांगितले असते तर बरे झाले असते. कॅबिनेट बैठकीत काही वक्तव्ये माझ्या आणि भुजबळ यांच्याकडून आली. यावर मुख्यमंत्र्यांनी विसंगत वक्तव्ये करु नये असे सांगितले. एकाच सरकारमध्ये विसंगती नको, जे ठरलेले आहे आणि घडलेले आहे तेच बोला. खेळीमेळीत चर्चा झाली, मी आता जे बोललो तेवढेच घडल्याचे मंत्री शंभुराज देसाईंनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्र्यांनी शंभुराज देसाई आणि छगन भुजबळ यांच्यातील वादावर कालच्या बैठकीत कानपिचक्या दिल्याची माहिती समोर आली आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मंत्रिमंडळात गँगवॉरसारखी परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. शिवाय एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याच्या अंगावर धावून गेल्याचे म्हटले आहे. यावरून मुश्रीफांनी राऊतांना सिद्ध करण्याचे आव्हान दिलेले असताना शंभुराज देसाई देखील आता समोर आले आहेत. 

राऊतांचे खबरे त्यांना अडचणीत आणतील, चार टर्म खासदार असे बोलतो हे आम्हाला आश्चर्य वाटते. राऊत सिद्ध करु शकले तर राजीनामा देऊ असे मुश्रीफ बोलले, मी देखील त्यांच्याशी सहमत आहे. राऊतांना काम करणे नीट जमते, त्यांना तेच काम दिलेले आहे. जे घडले नाही ते भासवले जातेय. राऊतांना महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही, असेही देसाई म्हणाले. 

गेल्या दीड दोन वर्षात कोणाला त्यांनी चांगले म्हटलेय का? बाकी सगळेच वाईट, विश्वज्ञानी मी एकटाच अशी त्यांची मानसिकता आहे. आयोग, न्यायालये स्वायत्त असतात हे त्यांना कळले पाहिजे, असे देसाई म्हणाले. 

गेले वर्षभर आम्ही निवडणुकीची तयारी करत आहोत. माध्यमांसमोर ते बोलायचं नसते. ग्रामपंचायतीत आम्हाला अधिक जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्राचा कल कोणत्या बाजूनं आहे हे कळले आहे.  कोणी कुठे जावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अडीज वर्ष आम्ही हेच म्हणत होतो, काही ना काही निमित्त का होईना ते बाहेर पडतायत, असा टोला देसाई यांनी उद्धव ठाकरेंच्या मुंब्रा दौऱ्यावर लगावला. याचबरोबर ज्याच्याकडे पक्ष आणि चिन्ह त्यांच्याकडे या शाखा राहतील, असेही देसाई म्हणाले. 

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईChagan Bhujbalछगन भुजबळSanjay Rautसंजय राऊतMaratha Reservationमराठा आरक्षण