शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive: कारखान्यांमधील  स्फोटांचं मूळ सापडलं; सरकारच्या 'या' धोरणाचा अतिरेक ठरतोय घातक!

By यदू जोशी | Updated: August 31, 2019 12:43 IST

...अन् सुरक्षेच्या यंत्रणा अनेक कारखान्यांमधून झाल्या बेपत्ता!

ठळक मुद्देईझ ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत उद्योगांसाठी लागणाऱ्या अनेक परवानग्या कमी करण्यात आल्या.'ईझ ऑफ डुईंग बिझनेस'चा अतिरेक घातक ठरत असल्याचं दिसतंय.

>> यदु जोशी 

मुंबई- राज्यामध्ये गेल्या काही वर्षात कारखान्यांमधील स्फोटांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्याच्या मुळाशी सरकारच्या ईझ ऑफ डुईंग बिझनेसचा अतिरेक असल्याचे समोर येत आहे.

कारखान्यांची उभारणी करण्यासाठी आणि कारखान्यांच्या संचालनासाठी आवश्यक असलेल्या परवान्यांची संख्या कमी करून इंडस्ट्री फ्रेंडली वातावरण तयार करण्याचा विद्यमान राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने ईझ ऑफ डुईंग बिझनेस ही संकल्पना राबवण्यात आली. त्याअंतर्गत उद्योगांसाठी लागणाऱ्या अनेक परवानग्या कमी करण्यात आल्या. विविध प्रकारच्या परवान्यांसाठी उद्योजकांना सरकारचे उंबरे झिजवावे लागू नयेत म्हणून ही संकल्पना आणली गेली पण काही बाबतीत आता अतिरेक होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

ईझ ऑफ डुईंग बिझनेस आणण्यापूर्वी प्रत्येक कारखान्याला तेथील अग्निशमन यंत्रणेसह सुरक्षेच्या विविध उपाययोजना  नियमानुसार आहेत की नाही याची याचे प्रमाणपत्र दर सहा महिन्यांनी घ्यावे लागायचे.  एमआयडीसीची यंत्रणा हे प्रमाणपत्र कारखान्याची तपासणी करून देत असे. मात्र ईझ ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत असे प्रमाणपत्र कारखान्यांनी  घेण्याची अट रद्द करण्यात आली आणि "आमच्या कारखान्यात  सुरक्षेच्या सर्व उपाययोजना योग्य पद्धतीने करण्यात आलेल्या आहेत असे कारखान्यांनी स्वयंप्रतिज्ञापत्रावर लिहून द्यावे अशी मुभा देण्यात आली. त्यामुळेच कारखान्यांमधील स्फोटांची संख्या वाढताना दिसत आहे. 

कारखान्यांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना करणारी यंत्रणा ही खर्चिक आहे. त्यामुळे अनेक कंपन्या त्यात टाळाटाळ करतात. आता प्रमाणपत्राची अटच न राहिल्याने अनेक कारखान्यांनी अशी यंत्रणा उभी करण्याचे सोडून दिले आणि थातुरमातुर उपाययोजना केल्या व आमच्याकडील सुरक्षा यंत्रणा भक्कम आहे असे लिहून दिले. त्यामुळे स्फोटासारख्या दुर्घटना घडू नयेत म्हणून करावयाच्या उपाययोजना आणि दुर्घटना घडल्यानंतर त्यावर वेळीच नियंत्रण आणण्याची यंत्रणा अनेक कारखान्यांमधून बेपत्ता झाली आहे.----------------------------------------

ईझ ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत कारखान्यांमधील सुरक्षा  उपाययोजनांबाबत स्वयंप्रतिज्ञापत्राची मुभा देणे चुकीचेच होते असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज लोकमतशी बोलताना मान्य केले. ते म्हणाले की की अलीकडच्या काळात कारखान्यांमधील स्फोट आणि त्यात घडणारे मृत्यू यांची संख्या वाढत आहे. असे का घडते याच्या मुळाशी गेल्यानंतर आमच्या ते लक्षात आले.   आता पूर्वीचीच अट लागू केली जाईल. सुरक्षिततेच्या उपाययोजनांची नियमितपणे तपासणी केली जाईल आणि अशा दुर्घटना टाळल्या जातील.

टॅग्स :DhuleधुळेShirpurशिरपूरbusinessव्यवसायMaharashtraमहाराष्ट्र