शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray: काही आजोबा बोलत आहेत, उद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना अप्रत्यक्ष टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 21:29 IST

वंचित समाजाला उभे करण्याचे काम बाबासाहेबांनी केले. स्वातंत्र अबाधित राखण्यासाठी जे जे सोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही जाणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे आम्ही दोघांचे नातू इथे बोलत आहोत. काही आजोबा बोलत आहेत. मग वाट दाखविणाऱ्यांना आदर्श मानायचे की वाट लावणाऱ्यांना मानायचे, हा प्रश्न पडला आहे, असा खोचक टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना नाव न घेता लगावला. 

प्रबोधन ठाकरे यांच्या स्मृतिदिनी पुस्तक, ग्रंथ, लेख आदींच्या वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. 

वंचित समाजाला उभे करण्याचे काम बाबासाहेबांनी केले. स्वातंत्र अबाधित राखण्यासाठी जे जे सोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही जाणार. माणुसकी हाच खरा धर्म. घटनेचा उल्लेख केला जातो. त्यात राज्य आणि केंद्राला समान अधिकार दिल्याचे ते म्हणाले होते. दोन तीन बाबी सोडल्या तर हे अधिकार राज्यांनाही दिले आहेत. परंतू ते आज दिसत नाहीत. वाटेल त्या मार्गाने सत्ता पाहिजे, ही माणसे लायक नाहीत. ह्यांना खाली पाय ओढून खेचले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. 

देशाचा कायदा मंत्री न्यायव्यवस्थेविरोधात वक्तव्य करतो. न्यायव्यवस्था संपली आहे, पंतप्रधानांनी यापुढे न्यायाधीश नेमावेत असे भासवण्यासाठी हे केले जात आहे. मग लोकांचा विश्वास असलेली न्यायालयेच बंद करा. माझ्यावरही उद्या खटला दाखल होईल. मग किरण रिजिजू यांच्यावर का नाही? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. 

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी आपले कोणत्या धर्माशी भांडण नव्हते, धर्मांनी सांगितलेल्या सामजिक व्यवस्थेशी भांडण आहे. जात या नावाचा सुद्धा एक देश आहे हे लक्षात घ्या. आपण ज्यावेळेस प्रबोधनकार वाचायला घेऊ तेव्हा कळेल की जात कशी ओढलेली आहे. आणि मग समता कशी येईल हे कळते, असे आंबेडकर म्हणाले. संस्कृती आणि भाषे मुळे समता येते असे ते म्हणाले. 

एकदा क्षत्रिय हरला कि उरलेले सगळे हरले. कारण शस्त्र घेण्याची पद्धत नव्हती याला छत्रपती शिवाजी महाराज अपवाद ठरले. आपण पहिल्या सेन्सस नंतर हिंदुत्व हा शब्द वापरायला लागलो. आपण समता आणि बंधुभाव या दोघांचा बळी दिला आहे. एक बाजूला दडपशाहीचे वातावरण वाढले आहे. दडपशाही जर बघायची असेल तर आपण मुस्लिमांना पहा म्हणतो.  वैदिक धर्मात तरी कुठे लोकशाही आहे, तिकडे सुद्धा हुकूमशाही आहे, असे आंबेडकर म्हणाले. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर