शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नपत्रिका येईल तशी उत्तरपत्रिका सोडवू; सुधीर मुनगंटीवारांचा सेनेवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 09:03 IST

सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज विधानभवनात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि विधानसभा सचिवांची भेट घेतली. 

मुंबई : भाजपची भूमिका ही ‘वेट अँड वॉच’ची आहे. जशी प्रश्नपत्रिका येईल, तशी उत्तरपत्रिका सोडवू. सध्याची चाचणी ही सत्ताधाऱ्यांची आहे. यात भाजपाचा विषय नाही. विधानसभा निवडणुकीत युतीला स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही आमच्या मित्र पक्षाने खुर्चीसाठी गद्दारी केली. जनादेशाचा अवमान केला, आता फेडत आहेत, अशा शब्दात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज विधानभवनात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि विधानसभा सचिवांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांची सुरक्षा आणि विधानसभेतील आसन व्यवस्थेसंदर्भात चर्चा केली. यानंतर माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, काही लोक धमक्या देत आहेत, गुंडगिरीची भाषा करत आहेत. अशांतता निर्माण करणारे भाष्य करत आहेत.  याकडे लक्ष द्यावे आणि विधिमंडळात प्रत्येकाला मुक्त वातावरणात लोकशाहीचा अधिकार बजावता यावा, हे आम्ही विधिमंडळ सचिव आणि उपाध्यक्षांच्या लक्षात आणून दिल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. शिवसेनेच्या आमदारांना सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी सरकारची आहे. हा महाराष्ट्र आहे. इथे गुंडगिरी करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी महाराष्ट्राची जनता आणि पोलीस विभागाचे अधिकारी सदसदविवेकबुद्धीने कृती करतील, असेही ते म्हणाले. राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी तातडीने विशेष अधिवेशन बोलावल्यानंतर राज्य सरकारने त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. यावर, तुमच्याकडे बहुमत असेल तर एका तासात ते दाखवू शकता. बहुमताचे दोन हात दाखवायला ३० दिवसांची मुदत कशाला हवी? हे ५ मिनिटांचे काम आहे. यात काय नवीन नसल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. यामुळे राजकारण तापले आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारShiv SenaशिवसेनाBJPभाजपा