कोकण रेल्वेतील प्रश्न सोडवा

By Admin | Updated: November 7, 2014 23:35 IST2014-11-07T22:19:17+5:302014-11-07T23:35:43+5:30

उमेश गाळवणकर : भानू तायल यांच्यावर केले गंभीर आरोप

Solve questions in Konkan Railway | कोकण रेल्वेतील प्रश्न सोडवा

कोकण रेल्वेतील प्रश्न सोडवा

कुडाळ : देशात नावलौकीक मिळविलेल्या कोकण रेल्वे महामंडळाला अधोगतीच्या मार्गाला नेण्याचे काम भानू तायल यांनी केले आहे. कोकण रेल्वेचा प्रवासी तिकीट काढून जीव धोक्यात घालून प्रवास करत असून, याची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, असे आवाहन केआरसी एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी केले आहे.
गेल्या दहा वर्षांत नोव्हेंबरपासून कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेचा वेग वाढविण्यात आला आहे. परंतु, यावर्षी कोकण रेल्वे प्रशासनाला गाड्यांचा वेग पूर्णपणे वाढविणे शक्य झाले नाही, याची जबाबदारी भानू तायल यांनी घेणे अपेक्षित होते. मात्र, असे झाले नाही. गेल्या चार वर्षात कोकण रेल्वेच्या ट्रॅकचा मेंटनन्स झालेला नाही. अपघात झाल्यास स्थानिक गँगमन, पीडब्लूआर यांच्यावर आरोपपत्र दाखल करुन त्यांना निलंबित करण्याचे काम तायल यांनी केले आहे. मात्र, अपघात होण्यास जबाबदार व्यक्ती म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांचा बळी देत भानू तायल यांनी ‘कुठे नेऊन ठेवलीय कोकण रेल्वे आमची’ असा सवालही गाळवणकर यांनी केला आहे. कोकण रेल्वेला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी कोकणातील नेत्यांनी मतभेद विसरुन एकत्र येणे गरजेचे आहे. अन्यथा रेल्वेच्या अपघातात झालेली जीवितहानी पाहण्याव्यतिरिक्त काहीही करु शकणार नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे आवश्यक झाले असल्याचे गावळवणकर यांनी प्रसिध्दीपत्रकातून म्हटले आहे.
कोकण रेल्वेच्या या ट्रॅकवरील अनेक प्रश्नांची उजळणी वेलेवेळी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात अले मात्र आता हे सो बस्स झाले यापुढे कोकण रेल्वेच्या संदर्भातले विविध प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आपण शांत रहाणार नाही असे आज गाशवणकर यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षात कोकण रेल्वेचे अनेक प्रश्न प्रलंबित ठेवण्यात भानू तायल जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. टॅक व्यवस्थापन, गाडीचा वेग. कर्मचाऱ्यांचे प्रश्न अनेक वर्षे रेंगाळत असल्याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून चौकशीची मागणी केली. (प्रतिनिधी)

मुख्यमंत्र्यांकडे गाळवणकरांची मागणी.
दहा वर्षात रेल्वे मार्गावरील वेग वाढविल्याची माहिती.
यावर्षी वेग वाढविण्यात आले अपयश.
तायल जबाबदारी झटकताहेत.
गेल्या चार वर्षात साधा ट्रॅकही व्यवस्थित राखता आला नाही.
विविध मागण्यांसाठी गाळवणकर यांची मागणी.
मतभेदाची उजळणी करीत राहण्यापेक्षा एकत्र येऊन प्रयन करणे गरजेचे.

Web Title: Solve questions in Konkan Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.