सावळेश्वरचा सैनिक जम्मूमध्ये शहीद
By Admin | Updated: July 29, 2016 17:44 IST2016-07-29T17:44:06+5:302016-07-29T17:44:06+5:30
आळंद तालुक्यातील सावळेश्वर गावचा व भारतीय सेना दलात वाहनचालक म्हणून सेवा बजावत असलेला शांतप्पा गुरूप्पादप्पा नेल्लगी (वय २४) हा सैनिक जम्मू भागात सेवा बजावत असताना

सावळेश्वरचा सैनिक जम्मूमध्ये शहीद
ऑनलाइन लोकमत
आळंद, दि. २९ : आळंद तालुक्यातील सावळेश्वर गावचा व भारतीय सेना दलात वाहनचालक म्हणून सेवा बजावत असलेला शांतप्पा गुरूप्पादप्पा नेल्लगी (वय २४) हा सैनिक जम्मू भागात सेवा बजावत असताना अतिरेक्यांच्या हल्लयात शहीद झाला़
२०१२ मध्ये सैन्य दलात दाखल झालेला शांतप्पा अजुनही अविवाहित होता़ त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे़.
शहीद शांतप्पा हा कुटुंबांचा एकमेव आधार होता़ यामुळे नेल्लगी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे़ जम्मू काश्मिरमधील तंग वातावरणामुळे शहीद सैनिकाचे पार्थिव आणण्यात मोठया अडचणी आल्यामुळे श्रीनगरहुन विमानाने हैदराबादला पार्थिव आणण्यात दिरंगाई होत आहे अशी माहिती पोलीसांनी दिली़.
उद्या शनिवार दुपारी सावळेश्वर येथे सरकारी इतमामात शांतप्पा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत़ या अंत्यसंस्कारामुळे सावळेश्वरला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे़ यावेळी प्रचंड जनसमुदाय जमणार असल्याने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याची माहिती आळंदचे पोलीस उपअधिक्षक पी़डीग़जकोश यांनी दिली़.