शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 18:50 IST

Sandeep Pandurang Gaikar: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अहिल्यानगरचे संदीप पांडुरंग गायकर यांना वीरमरण आले.

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमधील चतरू येथील सिंगपोरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत महाराष्ट्राचे सुपुत्र जवान संदीप पांडुरंग गायकर यांना वीरमरण आले.  गायकर यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी अहिल्यानगरातील अकोले येथील ब्राम्हणवाडा येथे उद्या आणण्यात येणार आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.

शहिद संदीप पांडुरंग गायकर गेल्या सहा ते सात वर्षांपासून सैन्यदलाच्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. मात्र,  २१ मे रोजी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात आई-वडील , पत्नी आणि मुलगी आहे. त्यांच्या वीरमरणाची बातमी पोहोचताच गावात शोककळा पसरली.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध ऑपरेशन दरम्यान जोरदार गोळीबार सुरू आहे. या चकमकीत एका जवानाला वीरमरण आले. ऑपरेशन अजूनही सुरू आहे, असे पोस्ट व्हाईट नाईट कॉर्प्सने एक्स हँडलवरून केली.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड येथील जंगलात दहशतवादी असल्याची माहिती भारतीय सैनिकांना मिळाली. यानंतर भारतीय सैनिकांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. दहशतवाद्यांची संख्या तीन ते चार असल्याचे सांगितले जात आहे. पहलगाम घटनेपूर्वी त्याच भागात तीन दहशतवादी मारले गेले होते. हा परिसर काश्मीरमधील अनंतनागच्या सीमेवर आहे. हे दहशतवादी काश्मीरमधून आले असण्याची शक्यता आहे. हे दहशतवादी जैश मोहम्मदचे असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या भागात दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर