ऑरेंज रिन्युएबलसोबत महाराष्ट्रातल्या 100 मेगावॅटच्या सौर ऊर्जाप्रकल्पाचा करार
By Admin | Updated: April 15, 2016 19:28 IST2016-04-15T19:28:31+5:302016-04-15T19:28:31+5:30
ऑरेंज रिन्युएबल या सिंगापूरस्थित कंपनीने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत 100 मेगावॅटचा वीज खरेदी करार केला आहे. हा प्रकल्प जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलर मिशन अंतर्गत महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे

ऑरेंज रिन्युएबलसोबत महाराष्ट्रातल्या 100 मेगावॅटच्या सौर ऊर्जाप्रकल्पाचा करार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - ऑरेंज रिन्युएबल या सिंगापूरस्थित कंपनीने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत 100 मेगावॅटचा वीज खरेदी करार केला आहे. हा प्रकल्प जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलर मिशन अंतर्गत महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे.
एसईसीआयने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे आवाहन करत ऑनलाइन लिलाव केला होता, ज्यामध्ये ऑरेंज रिन्युएबल पात्र ठरली आहे. या करारानुसार ऑरेंज रिन्युएबलकडून 25 वर्षे 4.43 रुपये प्रति युनिट दराने वीज खरेदी करण्यात येईल. हा प्रकल्प 2017 मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
नॅशनल सोलर मिशन अंतर्गतची उद्दिष्ट्ये वाढवण्यात आली असून 2021- 22 पर्यंत सौरऊर्जेच्या माध्यमातून 20 गिगावॅट निर्मितीचे लक्ष्य होते, जे वाढवून 100 गिगावॅट करण्यात आले आहे. भारत सौरऊर्जेला प्रचंड महत्त्व देत असून त्यामुळे या क्षेत्रातल्या गुंतवणूकदारांसाठी भारत एक आकर्षण ठरत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.